पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/९५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

९२ नवाव निजाम अल्ली ह्याचा पराभव केल्यापासून त्यांस 'गर्व बहुत झाला होता. यशाच्या फंदांत निमग्न झाले होते.' भाऊ सैन्यास घेऊन, फौजेचा पुरवठा केल्याशिवाय, मजलदरमजल करीत चालले. त्यांस मल्हारराव होळकर यांनीं 'दुराणी कांहीं सामान्य नाहीं यास्तव मोहरा इरेस पाडावा असा अर्थ नाहीं; माळवेप्रांतीं राहून छावणी क रावी, पुढें फौज मात्र सडी रवाना करावी' अशी पोक्त मसलत दिली. ती जवळच्या मंडळीनें 'आपली सलावत कांहीं सामान्य नाहीं' अशीं भाषणें करून धिक्कारिली, आणि सगळें लटांबर पुढे चाललें. पुढें गंभीरा नदीवर मुक्काम झाला तेव्हां मल्हाररावांनीं भाऊंस भेटून पुष्कळ छेडिलें: 'तुझी नदीपार येऊन एवढा मोहरा आणून इ- रेस घातला; आतां काढावयास यत्न नाहीं.' मग मंडळीचे डोळे उघडले, आणि बरोबर बायकामुलें आणिलीं होतीं, त्यांच्या आश्रयाची कांहीं तजवीज त्यांस करावी लागली. पुढें कुच केल्यानंतर दिल्ली सर झाली, आणि सुरजमल, शूर जाट लोकांचा राजा, आपल्या सैन्यानिशीं, मल्हारराव होळकर व जनकोजी शिंदे यांच्या खटपटीनें, भाऊंच्या सै- न्यास येऊन मिळाला. परंतु पुढें भाऊसाहेब त्या तिघांचीही सल्लामसलत ऐकेनात; आणि त्यांची अप्रतिष्ठा झालेली त्यांस सहन होईना. मग पैशाची टंचाई पडली; आणि दिल्लीस पातशाहाचे तक्तावर कचेरीस छत रुप्याचें होतें, तळहा- ताइतका पत्रा जाड होता, आणि त्यावर सोनेरी वखीं मु- लाम्याचें काम होतें, तें फोडावें असें भाऊंच्या मनांत आलें. त्यांना सुरजमल्लांनी सांगितलें कीं, मी पातशाही उमराव तुह्मांपाशीं आहें; ह्मणून आह्मांदेखत अशी गोष्ट -