पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/९४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ला. टिळकू ….…… स बार्ड, याचा आहे. आणि तेणेंकरून असे व्हावयाचें आहे कीं, ज्या ज्ञानाच्या संपादनानें सध्याच्या विद्वानांस मोठा गर्व वाटत आहे, तें ज्ञान, आणखी शेंदोनशें वर्षांनीं, कदाचित साधारण प्रतीच्या माणसांस प्राप्त होईल. ह्या ज्ञानाच्या वाढीचा अंत कोणासही लागावयाचा नाहीं. चुक्यांवर चुक्या. मनुष्य आहे तेथें चुकी आहेच. आणि स्वतंत्र दृष्टीनें पाहतां चुक्या तेथून सर्व सारख्याच. परंतु चुक्यांचे परिणाम लक्षांत आणून त्यांचा विचार केला ह्मणजे चुक्याचुक्यांत अंतर दिसून येतें. कुटुंबांतील प्रमुख माणसाची चुकी आणि राज्यांतल्या प्रमुख माणसाची - राजाची- चुकी, ह्या सारख्या नाहींत. कुटुंबांतल्या मुख्य माणसाच्या चुकीचें फळ एका कुटुंबांतल्या माणसांस मात्र भोगावें लागतें, आणि राजाच्या चुकीचें फळ सगळ्या राष्ट्रास भोगावें लागतें. - राघोबादादा उत्तरहिंदुस्थानांतून पंजाब सर करून आल्यानंतर, दुराणी अफगाणिस्थानांतून सूड घेण्याकरितां येईल की काय, ह्याची भीति पडली. आणि तिकडे को- णाला पाठवावें ह्याचा विचार होऊं लागला. राघोबांनीं साफ सांगितलें कीं, एक क्रोड रुपये खजिना बरोबर द्याल तर आह्मी हिंदुस्थानांत जातों. परंतु, मनुष्य स्वारीला गेला ह्मणजे त्यानें बरोबर कांहीं न नेतां लूट परत आणि- लीच पाहिजे, असे मानण्याची संवय ज्या मंडळीला होती, तिला हा सल्ला कोठून आवडणार? शेवटीं, सदाशिवराव भाऊंनी जावें असें ठरलें. त्यांनी तांदुळज्याच्या लढाईत