Jump to content

पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/९३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

९० वाढलें तरी उंटाएवढे मोठें कधीं व्हावयाचें नाहीं. आणखी वनस्पतींची वाढ आणि प्राण्यांची वाढ ह्यांत असें एक अं तर आहे कीं, वनस्पतींची वाढ होण्यास खनिज पदार्थाचा पुरवठा बस होतो; परंतु प्राण्यांची वाढ होण्यास वनस्प- तींच्या अगर प्राण्यांच्या योगानें उत्पन्न झालेले पदार्थ हवे लागतात. ह्मणजे, अर्थातच, ह्या जगांत वनस्पति पहिल्यानें व प्राणी मागून उत्पन्न झाले असले पाहिजेत. निर्जीवांची वाढ अमर्याद आहे; पण, अदृश्यांची वाढ तिच्याही पेक्षां अधिक अमर्याद आहे. खडक वाढत वाढत चालला तरी तो कांहीं हिमालयाएवढा मोठा व्हाव- याचा नाहीं. पण, मनुष्याची बुद्धि किती वाढेल ह्याची कल्पना देखील करितां यावयाची नाहीं. खनिज पदार्थ, वनस्पति आणि प्राणी ह्यांच्या वाढीस ज्या द्रव्यांची आवश्यकता आहे, तीं द्रव्यें बहुधा नियमित आहेत आणि समर्याद आहेत. परंतु, बुद्धीच्या वाढीस जें काय लागतें, तें कांहीं नियमित नाहीं, आणि तें केव्हां कशा- पासून प्राप्त होईल, ह्याविषयीं कांहींएक निश्चय सांगवत नाहीं. झाडावरून फळ खालीं पडतांना दिसणें, चाहादा- णीचें झांकण उडतांना दृष्टीस पडणें, गाईच्या आंचळांची लस लागून खरूज आलेली कळणें, सूर्यावरून शुक्राची क्रांति होत असतांना दिसणें, अशा लक्षावधि किंबहुना कोट्यवधि व्यापारांच्या दर्शनानें, आणि स्वतःच्या अनुभ वानें मनुष्याच्या ज्ञानाची वाढ होत आहे. शंभर वर्षीमार्गे ज्या गोष्टी मोठ्या शाहाण्या मनुष्यांच्या स्वप्नींही कधीं आल्या नव्हत्या, त्या आतां, अगदीं अजाण माणसांस साधारण वाटू लागल्या आहेत. हाच प्रकार पुढे चालाव-