पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/९२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

८९ ह्यांतले द्रियें नसतात, व ठरीव आकारही नसतो. तरी पोषक द्रव्य शोषून घेऊन त्यांतलें नको तें विष्ठेच्या रूपाने टाकण्याचें सामर्थ्य त्यांना असतें. एक प्राणी तुटून त्याचे दोन प्राणी होतात, आणि ह्याप्रमाणे त्यांची संख्या वाढते. कांहीं प्राणी वाळवून नंतर महिन्या दोन महिन्यांनीं पा- ण्यांत टाकिले की ह्यांची हालचाल पुनः सुरू होते. वरच्या पायरीच्या प्राण्यांना तोंड, नाक, इत्यादि अवयव असतात. ते अन्न खातात, पाणी पितात, आणि हवेचा श्वासोच्छ्वास करितात. हीं द्रव्यें प्राण्यांच्या शरीरापासून अगदी वेगळ्या वेगळ्या प्रकारांचीं, आणि मनुष्यानें कितीही शहाणपण खरचिलें तरी त्यांचें एकीकरण आणि शरीराशीं संमीलन व्हावयाचें नाहीं, अशीं आहेत. परंतु, वनस्पतींतल्या ज्या कोशांतर्गत सजीव पदार्थाच्या योगानें जमिनींतला रस रूपांतर पावून वनस्पति बनतो, त्यासारख्याच सजीव पदार्थाचें आमच्या शरीरांतलें चैतन्य बनलेलें असल्याच्या योगानें हीं कार्ये होतात. ही योजना विधात्यानें करून ठेविली आहे. निर्जीव पदार्थांची वाढ आणि सजीव पदार्थांची वाढ ह्यांमध्ये एक मोठें अंतर आहे. तें हें कीं, निर्जीव पदा- थची वाढ अमर्याद आहे, आणि सजीवांच्या वाढीस म र्यादा आहे. पूर्वी सांगितल्याप्रमाणे सगळे योग यथा- स्थितपणें चालल्यास खडक किती मोठा होईल, हें कांहीं सांगतां यावयाचें नाहीं. परंतु अमुक एक झाड किंवा अ मुक एक प्राणी ह्याची वाढ कोठपर्यंत होईल, ह्याचें अ- नुमान सांगतां येईल. वडाचा वृक्ष दोनहजार हात उंच कधीं व्हावयाचा नाहीं; त्याप्रमाणेच मांजर कितीही जरी