पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/९१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

८८ व एका जागीं अमृतफल अशीं कां उत्पन्न होतात ह्याचें गूढ अजून समजलें नाहीं. कार्बानिक आसिड वायु, पाणी आणि पृथ्वींतले क्षार ह्या अचेतन द्रव्यांस, त्यांचा त्या कोशांतर्गत पदार्थाबरो- बर संपर्क झाल्याबरोबर आपल्या विलक्षण कुशलतेनें, तो विश्वाचा कारागीर सचेतनता देऊन त्यांजकडून अ गदीं निरनिराळी कामें कशीं करवितो, हें मनुष्याच्या बुद्धीस अगदी अतर्क्य आहे. ह्याविषयीं, स्थूलमानानें, रामदासस्वामींनी दासबोधांत ह्मटलें आहे पत्रें पुष्पें फलें भेद, किती करावा अनुवाद सूक्ष्म दृष्टीनें विशाद, होत असे. भूतांचे विकार सांगों किती, क्षणक्षणा पालटती एकाचे एकचि होती, नाना वर्ण. २. ह्मणजे, जीं द्रव्यें वनस्पतींच्या पोटांत जातात, त्यांतून अगदीं भिन्न प्रकारचें स्वरूप त्यांच्या एकवटलेल्या मिश्र- णास मिळतें, आणि त्यापासून नानाप्रकारचे रंग निष्पन्न होतात, हा मोठा चमत्कार आहे, असा भावार्थ. १. तोच प्रकार, पुष्कळ अंशीं प्राण्यांच्या वाढीचा आहे. ह्मणजे, ती वाढ आंतून होत असते, बाहेर भर पडून होत नसते. आणखी, ही वाढ होण्यासही जीं द्रव्यें लागतात, ती सगळीं त्यांस बाहेरून घ्यावी लागत असून, तीं शरीरांत प्रवेशल्यावर कांहीं अतर्क्स सृष्टव्यापारानें त्यांचें एकीकरण होऊन त्यांची सरूपता प्राण्यांच्या शरी- राशीं होते. सगळ्यांत नीच पायरीचे प्राणी पुष्कळ अंशीं वनस्पतींसारखेच असून केवळ वर सांगितलेल्या कोशांचे बनलेले असतात. त्यांस अवयव नसतात, इं-