Jump to content

पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/९०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

जशांचीं तशीं त्यांच्या उपयोगी पडत नाहींत. तीं आंत घेतल्यावर, कांहीं सृष्टक्रियेनें, त्या द्रव्यांस असें कांहीं वेगळें स्वरूप मिळतें कीं, त्याच्या योगानें, त्यांची आणि वनस्पतींच्या प्रकृतीची एकरूपता होते. आणखी मग तें नवें दिव्य द्रव्य वनस्पतीच्या वृद्धीस कारण होतें. ह्यां- कोणत्याही जीवंत झाडाचा कोणताही भाग सूक्ष्मदर्शक यंत्रानें पाहिला ह्मणजे, तो एके ठिकाणी जमलेल्या सूक्ष्म कोशांचा मिळून झालेला आहे असें दिसून येतें. पैकी कोणताही कोश स्वतंत्र रीतीनें पाहिला ह्मणजे त्याचे मुख्य दोन भाग दिसतात. एक, कोशाचें आव- रण; त्याला आपण कोशभित्ति ह्मणूं. ही पारदर्शक अ सते. दुसरा, त्या भिंतीच्या आंतला पदार्थ. हा कोशांत- र्गत पदार्थ, कोश फार जून झालेला नसला ह्मणजे बहुत- करून चिकट आणि रवाळ असतो; आणि हाच वनस्प- तींच्या वाढीचें मुख्य कारण होय. ह्या पदार्थाला जीव असतो, आणि कधीं कधीं त्याची आंतल्याआंत गतिही चाललेली असते. ह्या पदार्थाचा असा धर्म आहे कीं, कोशाच्या बाहेरच्या बाजूस आलेला पौष्टिक रस तो आंत शोषून घेतो, आणि ह्याप्रमाणें त्याला पुष्टी मिळाली ह्म- णजे, आपोआप त्याचे आंतल्याआंत दोन विभाग हो- तात, आणि त्यांच्या दरम्यान एक नवीन कोशभित्ति उत्पन्न होऊन, एकाचे दोन कोश होतात. ह्याप्रमाणें त्या कोशांची संख्या वाढत गेल्यामुळे वनस्पति वाढतात. हे कोश कोणत्याही झाडांतले पाहिले तरी त्यांत विशेष भेद दिसत नाहीं. परंतु त्यांची संख्या वाढत गेल्यापासून, एका जागी पानें, एका जागीं फळें, एका जागीं कुचल्याची बी