पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/८९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

८६ - घेतल्याच्या योगानें त्या थेंबाच्या बुडाजवळच्या खडकाला चिकटून राहातात. याच्या योगानें, प्रत्येक थेंब खालीं पड- तांना, एक एक अगदीं पातळ- फारच पातळ - किंबहुना सोन्याच्या वर्षापेक्षांही पातळ- असा क्षाराचा थर तेथें ब- सतो. आणि अशा प्रकारें थरावर थर, थरावर थर, ज मून, तेथें बोटांसारखे सुळे वाढलेले दिसतात; आणि त्यां- च्यामध्यें, त्यांप्रमाणेंच, दुसरे लहान लहान सुळे वाहून, तो सगळा खडक वाढल्यासारखा होतो. त्याप्रमाणेंच, स्फ- टिकरूपी पदार्थांची वाढ कशी होते ती पाहाण्यासारखी असते. मिठाच्या द्रवांत एक मिठाचा खडा टांगून ठेवावा, आणि तें मिठाचें पाणी वाळूं द्यावें. ह्मणजे त्या खड्या- वर मिठाचे थर बसून तो वाढतो. हिरा देखील, कार्बा- नाचे असेच कण बसून बसून वाढतो अशी कल्पना आहे. ह्या जड पदार्थांच्या वाढीच्या संबंधानें एक गोष्ट लक्षांत ठेविली पाहिजे; ती ही कीं, खनिज पदार्थांच्या वाढी- करितां जीं द्रव्यें बाहेरून येऊन त्यांस मिळतात, तीं प्रकृतीनें, जशांचीं तशींच राहतात. ह्मणजे, त्या पदार्थात त्यांचें संमीलन होण्यास त्यांच्या प्रकृतींत कांहींएक फरक पडण्याची आवश्यकता नसते. - हें दगडांच्या वाढीविषयीं- ह्मणजे सामान्यत्वें खनिज- पदार्थाच्या वाढीविषयीं झालें. आतां वनस्पतींच्या वाढी- विषयीं पाहावयाचें. तें ह्याहून अगदी वेगळे आहे. तें असें. त्यांस वाढण्यास ह्मणजे मोठें होण्यास बाहेरचींच द्रव्यें ध्यावी लागतात. तीं द्रव्ये त्यांस वातावरणांतून आणि मृत्तिकेंतून प्राप्त होतात. तीं मुळांच्या आणि जातात. पण, तीं पानांच्या द्वारानें वनस्पतींत शोषिली