पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/८८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

८५ चित नाहीं साधणार; न साधो. पण साधेल तितका तरी साधावा. तितकें सुख पदरांत पडेल. वाढणें. ह्यांत दगड वाढतात, वनस्पति वाढत असून त्यांस जीव असतो, आणि प्राणी वाढत असून व त्यांस जीव असून त्यांना सुखदुःख कळतें. अशा ह्या तीन कोटि, क्र- मानें, एकाएका अधिक गुणानें युक्त आहेत. वाढणें हा गुण तिहींत आहे. हा गुण वनस्पति आणि प्राणी ह्यांत स्पष्टपणे दिसून येतो. कांकडीचा वेल काल होता त्यापेक्षां आज अधिक लांब झाला आहे, आणि मां- जरीचें पिलूं एका महिन्यामागें होतें, त्यापेक्षां आतां मोठें झालें आहे, ह्या गोष्टी लहान मुलांस देखील कळत अस तात. पण, दगडाची वाढ होत असते ती लवकर ल क्षांत येत नाहीं. ती पाहायास, पाणी थिबकत असतें, असे खडक कितीएक दिवसपर्यंत पाहिले पाहिजेत. एकाद्या कपारींतून थेंबथेंब पाणी खालीं थिचकत असतें, तेथें, ह्म- णजे त्या थेंबाच्या बुडाशीं, दगड वाढत असतो. असा की, पाण्याचा थेंब जेव्हां तेथें लोंबकळूं लागतो, तेव्हां त्यांत पाण्याचे कण पुष्कळ असल्यामुळें, त्यांस, त्यांच्या बरोबर खडकांतले वाहून आलेले क्षार आपणांत संभाळून धरण्याचें सामर्थ्य असतें; पण, तो थेंब खालीं पडण्याच्या आधीं, त्यांतल्या पाण्याच्या कांहीं कणांची वाफ होऊन गेल्यामुळें, बाकी राहिलेल्या कणांच्यानें त्या क्षारांच्या परमाणूंस सांवरवेनासें होतें; आणि सांवरतनासे झालेले ते क्षारपरमाणु, कपारीच्या गुरुत्वाकर्षणानें ओढून तो