Jump to content

पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/८७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

८४ त्यास ह्मणाला, 'महाराज, इताली घेतल्यावर आपण काय करणार ? " पैहस – मग मी सिसिली घेईन. - - सिनीज – सिसिली घेऊन आणखी बाकीचें सगळें जग घेतल्यावर मग काय करणार ? पैन्हस – मग मी स्वस्थ राहीन, आणि आनंदानें कालक्रमणा करीन. सिनीज – तर मग तसे स्वस्थ आतांच राहून, आ- नंदानें कालक्रमण कां करीत नाहीं ? तात्पर्य एवढेंच की, सर्व प्रकारच्या कामांत आत्मजय पाहिजे. राजे झाले ह्मणून काय झालें ? आत्मजय केल्या- वांचून सुख होत नाहीं. लार्ड बेकन ह्मणतो, 'मोठ्या पदास चढत जाणें तें मळसूत्री जिन्यानें वर चढण्यासारखें आहे. आणखी, राजे हे आकाशांतल्या ताऱ्यांप्रमाणें आ- हेत; ह्मणजे, त्यांस लोकांकडून मान पुष्कळ मिळतो पण त्यांना विश्रांति मुळींच नसते.' तें खरें आहे तें कोणा- विषयीं ? जे राजे आत्मजय करीत नाहींत त्यांविषयीं; इतरांविषयीं नाहीं. आपणाच्यानें करवेल तितका आपण आत्मजय क रावा. तो आरंभी अमळसा कठिण वाटतो. तो करायास मन मुठीत धरावें लागतें. पण परिणामी त्यापासून फार सुख होतें. इतिहासाकडे विचारदृष्टीने पाहिलें तर असें दिसून येईल कीं, ज्यांनीं आत्मजय केला होता, त्यांसच ह्या पृथ्वीवर सुख झालें. आणखी, दुनयेमध्यें जे कोणी महासाधु होऊन गेले, त्यांनीं जें काय महत्कृत्य ह्मणून केलें तो हा आत्मजयच होता. तो आपणांस त्यांचे इतका कदा-