पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/८४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

८१ नानाप्रयत्न करितां धरणीपतीचे देखील यत्न फसतात महामतीचे सिद्धीस यास्तव जगत्पति साह्य व्हावें तें मागतों नमुनि त्यास अनन्य भावें. होणार तें प्रबल भूपतिला टळेना होणार काय पुढतीहि कुणा कळेना त्याच्या करा मग कशास्तव काळजीतें या निश्चयें स्थिर सदा धरितों मतीतें. संपत्ति आत जन हीं क्षणिकेंचि होती त्यांहीं सुखें न असुखें जगतांत होती जाणोनि तद्विषयलोभ जिवीं धरीना दुःखी तथा विरह त्यास कधीं करीना. अन्योपकारसम पुण्य असे न मोठें नाहींच पाप परपीडनतुल्य कोठें हें ज्ञानतत्त्व दिनरात तयांत जागे लोकांत तें धरुनि धोरण नित्य वागे. समाधान आहे जनप्रेम आहे जगत्पालकी भक्तिवैपुल्य आहे नसे याहुनी दूसरें सौख्य नाकी धरा स्वर्ग सुज्ञांस ही भावना की. ३. ६. ७. आत्मजय. साधारणपणें जय- मग तो कोणत्याही कामांतला असो- फार संतोषकारक असतो. पण, ज्या ज्या मानानें शत्रु प्रबल असतो, त्या त्या मानानें त्या जयाची योग्यता मोठी असते; आणि त्या योग्यतेच्या मानानें संतोष मोठा असतो.