पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/८५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
८२

हा संतोष अमक्या प्रकारच्या माणसांस मात्र मिळावा, आणि अमक्या प्रकारच्या माणसांस मिळू नये, असा पंक्तिप्रपंच परमेश्वरानें केला नाहीं. ह्मणजे, हा संतोष सर्वोस मिळण्यासारखा आहे. हा विचार थोडा आध्या- त्मिक आहे. आपणां सर्वोस ठाऊक आहे कीं, आपलें मन हें ओढाळ गुरूं आहे. हें जाऊं नये तिकडे जातें, आणि शिवूं नये त्याला शिवतें. त्यास तिकडे न जाऊं देणें, आणि त्यास आपले स्वाधीन ठेवणें हा एक फार मोठा जय आहे. इतर जय मिळविण्यास शत्रु बाहेरून यावा लागतो; पण, हा जय प्राप्त करून घेण्यास कोठें बाहेर जाणें नको. ह्यास शस्त्रें नकोत, अस्त्रे नकोत, सैन्य नको, हत्तीघोडे नकोत, पैसा नको, कांहीं नको. एक. दृढनिश्चय असला ह्मणजे बस झालें. आपलें मन जिं कून तें नेहमीं आपल्या स्वाधीन ठेवणें हाच आत्मजय होय. ह्याची बरोबरी दुसऱ्या कोणत्याही वत नाहीं. आणखी, ह्या जयावरून माणसाची खरी पारख होते. समरांगणीं जय मिळविण्याचा प्रसंग सर्वस प्राप्त होत नाहीं. शिकंदर बादशाहा जर आमचे कडच्या घिसाड्यांत जन्मास आला असता, तर, त्याला समरांगणांतले जय मिळवितां आले नसते. ते त्यानें मिळविले, हे त्याच्या कालदेशवर्तमानाचें सामर्थ्य होय; त्याचें स्वतःचें सामर्थ्य नव्हे. त्यानें समरांगणीं शत्रूंस जिंकलें, पण, त्याला, आपलें मन जिंकतां आलें नाहीं. त्यानें सगळ्या पृथ्वीस आपल्या इच्छेप्रमाणें वागा- यास लावलें, पण आपल्या अंतःकरणास आपल्या इच्छे प्रमाणें त्यास वागवितां आलें नाहीं. मद्यपान हा फार