Jump to content

पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/८३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

८० किंवा कुत्र्यांला त्याचें विष बाधत नाहीं. हा शोध युरो- पांतल्या सर्व लोकांना मान्य झाला आहे, आणि त्याच्या योगानें भयंकर मरणापासून शेंकडों लोकांची सुटका झाली आहे. आतां, जसा त्यांनी कुत्र्याच्या विषावर उपाय काढिला आहे, तसा सर्पाच्या विषावर उपाय जर त्यांनीं काढिला, तर सगळं जग व विशेषेकरून हिंदुस्थान त्यांचे फार फार उपकार मानील. पास्तूरांसारखे महापुरुष परदेशांत उत्पन्न होऊन जसे हिंदुस्थानाच्या उपयोगी पडत आहेत, तसे कांहीं महापुरुष हिंदुस्थानांत उत्पन्न होऊन, परदेशांच्या उप- योगीं पडोत, असें आह्मी परमेश्वरापाशीं मागणे मागून, आणि पास्तूर ह्यांस “आयुष्मान् भव" ह्मणून, हें चरित्र समाप्त करितों. ज्ञानवंत सुखी असतो. श्लोक. ज्ञानेंकरोनि रमतें मन हो जयाचें आहे खरोखरिच पुण्य महा तयाचें त्यासारखा जन सुखी त्रिजगांत नाहीं कीं त्याजला किमपि ऊन पडे न कांहीं. मी मी करोनि करिती जन गर्व जो तो पाहोनि सत्य परिणाम विनम्र होतो तेणें स्वमित्र गणितात तयास सारे अप्रीति यास्तव अपाप अशेष वारे. १. २.