Jump to content

पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


झाले होते. तें पुस्तक लोकप्रिय होऊं लागलें होतें. आणि माधव चंद्रोबांचा सर्वसंग्रह बंद झाल्याच्या योगानें महाराष्ट्रकाव्यप्रियांस जी हानि झालीशी वाटत होती, ती नाहींशी होण्याचा प्रसंग जवळ येत आहे अशी आशा लागली होती.

 इतक्यांत सगळा ग्रंथ आटपला. त्यांस मधुमेहाची व्यथा पूर्वीपासून होती; त्यांत चारपांच दिवस ज्वर येऊन, आणि शेवटीं कफ होऊन, गेल्या महिन्याच्या एकुणिसाव्या तारखेस दुपारी दीड वाजतां ठाण्यास देवाज्ञा झाली ! आणि तें सुशीलत्व, तो उद्योग, आणि ती रसिकता ह्यांची समाप्ति झाली ! काय करावें ? ह्यांचें द्वितीय कुटुंब आहे. ह्यांस पुत्रसंतान नाहीं. विद्वान, सुशील, निर्व्यसन, परोपकारी आणि उद्योगी असे हे गृहस्थ होते. ज्यांचा ज्यांचा ह्मणून संबंध ह्या गृहस्थांशी झाला होता, त्यांस त्यांस ह्यांचेविषयीं अत्यंत पूज्यबुद्धि उत्पन्न झालेली आहे. जनार्दन बाळाजी परलोकवासी झाल्याचें वर्तमान कान पडल्यावर डोळ्यांतून अश्रुधारा यावयाच्या नाहीत, असा त्यांचा परिचित मनुष्य कोठेंही सांपडावयाचा नाहीं. असो परमेश्वराला आवडलें तें झालें. त्यास आपण माणसांनीं मान्य असलेच पाहिजे. त्याविषयी कुरकुरून उपयोग नाहीं. आतां त्यांच्या संबंधानें एवढेंच ह्मणणें आहे कीं, परमेश्वर त्यांच्या कुंटुंबाच्या माणसांस त्यांचें वियोगदुःख सोसण्यास शक्ति देवो, आणि त्यांच्या आत्म्यास चिरकाल शांति देवो.