पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

असा त्यांचा स्वभाव असल्याच्या योगानें ती सगळी मंडळी त्यांवर खूप असून, त्यांस मनापासून भजत असे. आणखी, ठाण्याचें हैस्कूल जें सध्या इतक्या उत्तम स्थितीस पावले आहे, त्यास कारण जनार्दनपंतांचे परिश्रम आणि सुशीलत्व हीं होत.

 हे शिक्षक होते; पण केवळ तेवढेंच काम करून ते स्वस्थ राहिले नव्हते. त्यांस शास्त्रीय विषयांची आवड फार असे. ज्योतिषशास्त्र हा त्यांचा फार आवडता विषय होता. सध्याच्या आपल्या ज्योतिषामध्यें चुक्या आहेत, हें ज्या गृहस्थांनी आलीकडे उघड करून दाखविलें आहे, त्यांत हे प्रमुख होते. सायनपंचांग छापून प्रसिद्ध होऊं लागण्यास मुख्य परिश्रम त्यांचे होत. काव्येतिहाससंग्रह ह्मणून जें एक उत्तम मासिकपुस्तक चालू होतें, त्यांतला मराठी काव्यांस टीपा देण्याचा उद्योग ह्यांचा होता. भास्कराचार्य व तत्कृत ज्योतिष, वेदांग ज्योतिष, जगाचा इतिहास, इत्यादि कितीएक चांगल्या माहितीचीं पुस्तकें त्यांनी छापून प्रसिद्ध केली आहेत. शिवाय विविध-ज्ञानविस्तार, बालवोध, इत्यादि मासिक पुस्तकांत त्यांचे निबंध प्रसिद्ध झाले आहेत. बालबोधावर त्यांचे फार उपकार झालेले आहेत. त्यांबद्दल त्यांचें उतराई बाल-बोधानें आतां कसं व्हावें? शास्त्रीय विषयांच्या ज्ञानाचा : प्रसार स्वदेशबांधवांत पुष्कळ व्हावा, अशी त्यांस फार इच्छा होती. त्यांचे मनांत बालबोधशास्त्रपाठमाला काढावयाची होती. आणि त्याप्रमाणे एकदोन पुस्तकं त्यांनी लिहूनही ठेविली आहेत. शिवाय, आलीकडे तीन महिने, ते काव्यसंग्रह नामक नवीन मासिकपुस्तकाचे कर्ते