पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/७६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

जुलै-१८९०. वालवोध. ______-845@$84 लुई पास्तूर. तत्ववेत्त्यांचें मत असें आहे कीं, सृष्टीमध्यें रोग आणि त्यांच्या निरसनाचे उपाय हे दोन्ही शेजारींशेजारीं भर- लेले आहेत. त्यांपैकी रोग हे प्राण्यांस आपोआप होतात; त्यांस शोधून बोलावून आणावें लागत नाहीं; परंतु, त्यांच्या निरसनाचे उपाय जे आहेत, ते शोधून काढावे लागतात; आणि ते शोधून काढण्यास मोठी बुद्धि, मोठा उद्योग आणि मोठी सहनशीलता हीं लागतात. आणि ह्या गुणांनी युक्त अशा व्यक्तिही, परमेश्वर, जगाच्या कल्या- णाकरितां, कालदेशवर्तमानानुरूप उत्पन्न करीत असतो. त्यांतच लुई पास्तूर ह्या गृहस्थांची गणना आहे. त्यांचें चरित्र आह्मी आज येथें सादर करितों.