पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/७५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

७२ आहे. त्याचें मत असें झालें आहे कीं, युरोपांत प्रवास केल्यानें जपानी किंवा कोणत्याही परकीय लोकांची वृत्ति बिघडते. कांहीं अंशीं खरें आहे. नाशकाजवळ एका खाणींत मनुष्याच्या शरीराचे कांहीं अवयव सांप- डले आहेत. डोकें सांपडलें आहे, त्याच्या दोन कानशिलामध्यें अंतर तीन हात आहे. एक दोन दांत सांपडले आहेत; त्यांची लांबी साहासाहा इंच आहे ! न्यूग्रानडा देशांमध्यें एक झाड आहे. त्याचा चीक ही उत्तम शाई आहे. त्या चिकानें कागदावर ल्याहावें तेव्हां अक्षरें तांबडी दिसतात. पण प्रहर दोन प्रहरांत तीं काळीं भोर होतात. आणखी, ते कागद पाण्यांत भिजले तरी तीं अक्षरें जशाचीं तशीं कायम राहातात. सैनर सक्सी हे एक इटालियन गृहस्थ जबरदस्त उपास करणारे आ- ह्ते. ह्यांनी लंडन शहरांत ता० १७ मार्च पासून २६ एप्रिल १८९० पर्यत चाळीस दिवस खडखडीत उपास केला. त्यांनी एक औषध तयार केलें आहे, त्याच्या योगानें त्यांस उपास करितां येतो असें ह्मणतात. गेल्या नोव्हेंबर महिन्यांत बंगाल इलाख्यांत दमदम येथें चार इंग्रज शिपायांनीं मिळून एका मुसलमानाचा खून केला. त्यांपैकीं एकाला फां- शीची शिक्षा झाली होती. परंतु कोर्टाच्या संस्कारांत कांहीं चूक झाल्याच्या कारणावरून त्याला सोडून दिलें. आतां त्या चार इंग्रजांपैकी दोन आस्ट्रे- लिआस व दोन इंग्लंडास गेले आहेत. त्यांस त्यांच्या वाटखर्चाबद्दल सर- कारानें पांचपांचशे रुपये दिले !!! A मुंबई इलाख्याची तिसरी प्रांतिक सभा गेल्या महिन्यांत पुण्यांत भरली होती. मे. काजी शाहाबुद्दीन हे अध्यक्ष होते. त्या वेळेस, दारूची दु- कानें कोठें घालावींत, हें ठरविण्याचा अधिकार म्युनिसिपालिट्यांस असावा; शाळांची फी वाढवूं नये, गरीब मुलांस शिक्षण फुकट देण्याची तजवीज सरकारानें करावी; ठाणें व कुलावा व्यतिरिक्त इतर जिल्ह्यांतील जंगल सं- बंधाच्या तक्रारींबद्दल कमिशन नेमावें; प्राप्तीवरील कर वसूल करण्याची रीत सुधारावी; पोलिसांतील शिपाई, नाईक, ह्यांचे पगार वाढवावे, नवीन पोलीस आक्टावरून लोकांस त्रास न होई असें करावें; देशी भाषा युनि व्हर्सिटीच्या शिक्षणक्रमांत घ्याव्या; जंगली जनावरांपासून शेतकऱ्यांस त्रास होतो झणून त्यांस शस्त्रे घेऊं द्यावीं; असे ठराव पास झाले.