पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/७७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
७४

 पास्तूर हे फ्रान्स देशांत डोल येथें इसवी सन १८२२ ह्या वर्षी जन्मले. त्यांचे वडील नेपोलियन बादशाहाच्या धामधुमीत लप्करी शिपायाच्या नोकरीवर होते. त्या वे ळच्या लढाया संपल्यानंतर त्यांस घरी बसून कातडीं क माविण्याचें काम करून आपला निर्वाह करावा लागला. पास्तूर हे प्रथमतः बेसांकान येथील शाळेत जाऊन शिकले. तेथें त्यांना रसायनशास्त्राची गोडी लागली; आणि तेव्हांपा- सून त्या शास्त्राचा त्यांनी व्यासंग केला. सन १८४३ ह्या वर्षी ह्मणजे आपल्या वयाच्या बाविसाव्या वर्षी त्यांनी एकोले नार्माल ह्या पाठशाळेंत जाऊन पदार्थविज्ञानशास्त्राचा अभ्यास केला. तेथें असतांना त्यांनी स्फटिकाकृति पदा- र्थांच्या रचनेविषयीं एक अत्यंत गहन कोडें सोडवून मोठी कीर्ति संपादिली.
 पास्तूर हे बत्तीस वर्षांचे असतांना त्यांस त्यांच्या शा स्त्रीय विषयांच्या पारंगततेवरून लिलि येथील विश्वविद्या- लयांत एक मानाची जागा मिळाली. लिलि हें शहर मद्या- वरून प्रसिद्ध आहे. तेथें साखरेपासून अल्कोहोल नांवाचा मद्यार्क तयार करीत असतात. ह्या शहरीं असतांना पा स्तूर ह्यांनीं एक नवीन सिद्धांत काढिला; आणि त्याव- रून त्यांची फार ख्याति झाली. त्याचा प्रकार असाः- त्यावेळेपर्यंत युरोपांतील प्रमुख रसायनशाख्यांचें असें मत होतें कीं, ताडी, माडी, गूळ, साखर, इत्यादि पदा- थत जी स्वाभाविक क्रिया चालू होऊन त्यांची दारू ब- नते, ती क्रिया त्या पदार्थात हवेंतल्या प्राणवायूमुळे घ डते. ह्या मताच्या संबंधानें पास्तूर ह्यांनीं अनेक प्रयोग करून पाहून असें सिद्ध करून दाखविलें कीं, ती क्रिया