पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/७४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

लोक काय बोलतात. फ्रान्स देशांतून दरसाल ७५००० पौंड किंमतीचे केसांचे टोप बाहेर जातात. भोर आडनांवाचे एक मराठे गृहस्थ गेल्या वकिलीच्या परीक्षेत उत रले. हे अंध आहेत. नायग्रा धबधब्याच्या जोराच्या योगानें गिरण्या चालविण्याचा विचार चालला आहे. मद्रास इलाख्यांतून लार्ड कास यांच्या बिलाच्या विरुद्ध सुमारें सवा- लाख सह्यांचे अर्ज पार्लमेंटास गेले. गेल्या प्रांतिकसभेनंतर एक औद्योगिकसभा भरली होती. त्या वेळेस रा. ब. महादेव गोविंद रानडे यांचें व्याख्यान झालें. आमची विद्वान मंडळी प्रांतिक सभेस मुंबईचें कोणीही गेले नव्हतें. लानोलीस हवा खात बसली होती असे वाटतें !! ज्या हैस्कुलांत फीचें वगैरे उत्पन्न खर्चाच्या दोनतृतीयांशाइतकें नाहीं, तीं बंद करावीं, असा सरकारचा विचार आहे असें ह्मणतात. आमचे नवे गव्हरनर हे आपले सरकारी काम अगदी पद्धतवार नेमानें करीत आहेत; आणि त्यावरून ते अधिकाधिक लोकप्रिय होऊं लागले आहेत. एका क्षयी मनुष्याच्या फुप्पुसाचा रोगिष्ठ भाग कापून काढून प्रोफेसर टिलमन नांवाच्या एका युरोपियन डाक्टरानें त्यास बरें केलें असें ह्मणतात. फिलिपाइन बेटांत एका झाडास फूल येतें; तें गाडीच्या चाकाएवढे असतें. आणि त्याचें वजन अकरा शेर असतें. त्या फुलास तेथले लोक बोलो ह्मणतात. चिठ्ठी पाठवून किंवा निरोप पाठवून एका मनुष्याला दुसऱ्या मनुष्यास बेशुद्ध करितां येतें, व त्या बेशुद्धींत त्या मनुष्यावर पाहिजे तितके कठिण शस्त्र प्रयोग करितां येतात, असें सिद्ध झालें आहे. ओझाकी हा एक जपानी वर्तमानपत्रकर्ता युरोपांत प्रवास करून आला