पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/७३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

७० वाडी त्या सरदारास मिळावी, असा हुकूम त्यानें केला. त्याप्रमाणें ती सगळी व्यवस्था झाली. नंतर त्या शेतक- ज्यानें, झालेली सगळी हकीकत लिहून राजास कळविली, आणि तिजविषयीं पुरावा दिला. तेव्हां सगळें वर्तमान फिलिपाच्या मनांत येऊन, त्या कामदाराविषयीं त्यास फार वाईट वाटलें. तो अतिशयित संतापला, आणि त्यानें ती सगळी शेतवाडी त्या कामदाराकडून काढून त्या शेतक- ज्यास परत देवविली. आणखी त्या कामदाराच्या कपाळा- वर "कृतघ्न पाहुणा" असा डाहाणीचा डाग देवविला. गणित प्रश्नोत्तर. गोड, कडू, तुरट, आंबट, खारट, आणि तिखट असे साहा मुख्य रस आहेत. त्यांच्या चटण्या परोपरीच्या करावयाच्या आहेत. त्या प्रथम एक एक रस घेऊन, मग दोन दोन रस घेऊन, मग तीन तीन रस घेऊन, अशाप्रकारें साहा रसांपर्यंत करावयाचें आहे; त्यांत, जो रससमूह एकदां घेतला तो पुनः घ्यावयाचा नाही, ही अट आहे. तर, अशाप्रकारें वेगळे वे- गळे रस घेऊन चटण्या किती किती होतील, व एकंदर चटण्या किती होतील १ एक एक रस घेऊन दोन दोन रस घेऊन तीन तीन रस घेऊन चार चार रस घेऊन पांच पांच रस घेऊन साहा साहा रस घेऊन एकंदर चटण्या ६ होतील. १५ होतील. २० होतील. १५ होतील. ६ होतील. १ होईल. ६३ होतील.