पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/६४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६१ आणखी समाजोन्नति कशी करावी, ह्याची उदाहरणें आपल्या दृष्टीसमोर पाहिजेत तितकी आहेत. त्यांतलीं आपल्या सोईचीं साधनें आपण निवडून घ्यावी, आणि आपले काम साधावें, हेंच आपणांस उचित आहे. समाजोन्नति हा पाया आहे, आणि राज्योन्नति किंवा राष्ट्रोन्नति ही इमारत आहे; समाजोन्नति हा सूर्य आहे, आणि राष्ट्रोन्नति किंवा राज्योन्नति हा प्रकाश आहे; ए- व सांगणें बस आहे, असे वाटतें. येतें कंकणसूर्यग्रहण. त्या येत्या अमावास्येस मंगळवारी सूर्यग्रहण आहे. नर्म- देच्या दक्षिणभागी अमावास्येचा महिना धरितात. मानानें ही अमावास्या ज्येष्ठ मासांतील होय. आणि नर्मदेच्या उत्तरेस पौर्णिमेचा महिना धरितात. त्या मा नानें ही अमावास्या आषाढांतील होय. आणखी, इं- ग्रजी पंचांगाप्रमाणें ह्मटलें ह्मणजे त्या दिवशीं ह्या जून महिन्याची १७ वी तारीख पडते. सामान्य सूर्यग्रहणां- पेक्षां ह्या ग्रहणांत कांहीं विशेष चमत्कार आहे. कारण तें कंकणाकृति होणार आहे. असा चमत्कार स्थलविशेषीं फार वर्षांनीं दृष्टीस पडतो. परंतु ह्या ग्रहणाचा चमत्कार आमच्या सर्वच वाचकांच्या दृष्टीस पडेल, असें नाहीं. कांहींच्या दृष्टीस पडेल. सूर्याच्या आड चंद्र येऊन सूर्यास ग्रहण लागतें, हें तर सर्वांस ठाऊक आहेच. ग्रहण कसे लागेल, त्याची आकृति कागदावर किंवा फळीवर काढितात, तिला ज्यो- तिषशास्त्रांत परिलेख ह्मणतात. ख आणि ग परिले- ६