पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/६३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६०

रुष गुरुस्थानी आहेत, त्यांस घालवून देऊन, तीं कामें आपण स्वतः हातीं घेण्याचा प्रयत्न जपानी लोकांनी चा- लविला आहे. हें कशाचें फल ? समाजोन्नति होऊन त्या लोकांस हीं कामें करतां येऊं लागल्याचें नव्हे काय ? सांगावयाचें मुख्य तात्पर्य एवढेंच आहे कीं, एक एक मनुष्य शाहाणें झालें ह्मणजे सगळे कुटुंब शाहाणें होतें; अशीं सगळी कुटुंबें शाहाणी झालीं ह्मणजे तीच राज्याची किंवा राष्ट्राची उन्नति होय. ह्मणजे, पर्यायेंकरून असें ह्मणावयाचें कीं, आमच्या ह्या राष्ट्राची उन्नति होण्यास आमच्या समाजाची उन्नति झाली पाहिजे. आणखी, पुनः एकदां, समाजाची उन्नति झाली पाहिजे ह्मणजे काय ? अज्ञान गेलें पाहिजे; ज्ञानाचा प्रसार झाला पाहिजे; का- रण कोणतें आणि कार्य कोणतें हैं कळले पाहिजे; व्यर्थ अभिमान गळाला पाहिजे; स्वहितापेक्षां स्वदेशहित अ धिक वाटलें पाहिजे; स्वदेशहितार्थ केवढेही श्रम पडले, तरी ते सोसण्याचा निश्चय झाला पाहिजे; मनुष्य ह्या नात्यानें आपले जे हक्क आहेत, ते चालविण्याची हिम्मत धरिली पाहिजे; आणि आपण इतर माणसांसारखी माणसें आहोत, तिळमात्रही कमी नाहीं, आणि आपणांस जे कोणी कमी मानितील त्यांचें चालूं द्यावयाचें नाहीं, एवढा अभिमान पाहिजे; एवढी तत्वें जर आमच्या मंडळींत चां- गलीं बिंबलीं, आणि त्यांप्रमाणे त्यांचे हातून आचरण होऊं लागलें, तर, आमची सामाजिक उन्नति झाली, असें ह्मणण्यास कांहीं एक शंका वाटावयाची नाहीं; आणि ही अशी समाजोन्नति झाली, ह्मणजे राज्योन्नति किंवा राष्ट्रो- न्नति करण्यास वेगळे उद्योग करण्याचें प्रयोजन नाहीं.