पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/६२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५९

काय ? एब्राहाम लिंकन अगदी अक्षरशत्रु लांकूडतोड्या असतां, जार्ज वाशिंग्टनांच्या चरित्राच्या अध्ययनानें, मोठा महात्मा आणि पराक्रमी झाला नाहीं काय ? बरें, ह्या गोष्टी जर खऱ्या आहेत, आणि असे पुरुष तयार होणें हें जर कोणत्या तरी प्रकारच्या समाजोन्नतीचें फल आहे, तर समाजोन्नति ही राज्योन्नतीस कारणभूत नव्हे काय ? फार दूरचा दृष्टांत कशाला पाहिजे ? हिंदुस्था- नाला, इंग्लंडापेक्षां अफगाणिस्थान पुष्कळ जवळ आहे- फारच जवळ आहे. आणि राज्यसंपादनेच्छा, सामान्य नियमाप्रमाणे ह्मटली ह्मणजे, जशी इंग्लंडास आहे, तशी अफगाणिस्थानासही असली पाहिजे. शिवाय, केवळ बाहु- बलाच्या संबंधानें ह्मटलें असतां, इंग्लिशांपेक्षां अफगाण लोक श्रेष्ठ आहेत. परंतु, हिंदुस्थान इंग्लंडाच्या स्वाधीन आहे, अफगाणिस्थानाच्या स्वाधीन नाहीं. ह्याचें कारण आह्मी असें समजतों कीं, समाजोन्नतीच्या योगानें जसे मोठे पु- रुष इंग्लंडांत पैदा होतात, तसे, समाजोन्नति कमी अस ल्यामुळें, अफगाणिस्थानांत होत नाहींत. लार्ड क्लैव्ह, वारन हेस्टिंग्ज, मार्किस आफू वेलस्ली असे राज्यसंस्थापक पुरुष इंग्लंडांत उत्पन्न व्हावे, आणि अफगाणिस्थानांत होऊं नयेत- एवढा मोठा पराक्रमी अबदुल रहिमान तो देखील इंग्लिश सरकाराशीं हो हो करून त्यांचें ऐकून राहावा, ह्यांतलें बीज काय असावें बरें ! इंग्लंडांत समाजोन्नति झालेली आहे, आणि ती अफगाणिस्थानांत नाहीं, हें एक त्याचें मुख्य कारण नव्हे काय ? आलीकडे जपानाविषयीं असें सांगतात कीं, तेथील शाळांत, पाठशाळांत आणि कारखान्यांत इंग्लंड, फ्रान्स, इत्यादि देशांतले जे कोणी पु-