पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/६१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५८

हें एवढेसें दिसतें. पण, त्याची योग्यता सध्यां इतक्या झपाट्याने वाढत चालली आहे कीं, कांहीं कालानें त्याची गणना सांप्रतकाळच्या उत्तम राष्ट्रांत होऊं लागेल, असें दिसतें; आणखी, शोध करून पाहिला तर असे कळते कीं, हें सगळें फल त्या लोकांच्या समाजोन्नतीचें आहे.
 आतां, समाजोन्नति हें आहे तरी काय, हें पाहिलें पाहिजे. खरें ह्मटलें तर समाजोन्नति ह्याचा अर्थ एव ढाच आहे कीं, जनांतलें अज्ञान आणि तन्मूलक वेडगळ- पणाचे व्यापार नाहींतसे होऊन, ज्ञान आणि तन्मूलक शाहाणपणाचे आणि उदारपणाचे व्यापार चालू होणें. हें. शब्दांत थोडें दिसतें, पण, ह्याचा अर्थ फार व्यापक आहे. शिवाजी महाराजांच्या कारकीर्दीत महाराष्ट्राची राज्योन्नति झाली; नेपोलियन बोनापार्टाच्या वेळीं फ्रान्साची राज्योन्नति झाली; जार्ज वाशिंगूटनाच्या वेळीं अमेरिकेतल्या संस्थानांची राज्योन्नति झाली; इत्यादि गोष्टी अगदी खऱ्या आहेत. त्यांचें पृथक्करण करून पाहिलें ह्मणजे असें दिसतें कीं, त्या पुरुषांचे ठायीं अलौकिक गुण होते; त्यांच्या प्रभावेंकरून त्यांस त्यांच्यासारखे अनुयायी तयार करितां आले; आणि त्यांच्या साह्याने त्यांस महाकायें साधितां आलीं. पण, ते अलौकिक गुण त्यांस एकाएकीं-आकाशांतून पडून प्राप्त झाले होते काय ? शि- वाजी महाराजांस शौर्याची स्फूर्ति भारतकथाश्रवणानें झा- ल्याचें सर्वत्र प्रसिद्ध नाहीं काय ? बोनापार्टास लहान- पणापासून बंदूक उडविण्याचा आणि शिपायगिरीचा नाद असल्यामुळे त्यास, कालदेशवर्तमानानुरूप, युद्धकला उ त्तम साधली, असे सगळे इतिहासकार ह्मणत नाहींत