पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/५८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

तल्या गरीब जनसमूहाच्या दुःखनिवारणाकडे लाविला पा- हिजे. ही गोष्ट युरोपांतल्या प्रमुख लोकांस मान्य होत आहे, आणि आमच्या इकडच्या कांहीं लोकांनीं व विशेष- करून बऱ्याच पार्शी व्यापाऱ्यांनीं तो प्रघात चालू केला आहे; हे त्यांस भूषणास्पद आहे. आपल्या सर दिनशांकडे संपत्ति जशी पुष्कळ आहे, तशी परमेश्वरकृपेनें त्यांस संततीही चांगली आहे. पुत्रांकडून त्यांनी जगाचा प्रवास करविला आहे; आणि ते पुत्र हळू हळू आपल्या वडिलांचा कित्ता गिरवीत आहेत. त्यांच्या पत्नी साकरबाई ह्या गेल्या मार्च महिन्यांत मरण पावल्या. त्याही मोठ्या उदार अंतःकरणाच्या होत्या. त्यांच्या हातून हजारों रुपयांचा धर्म झाला आहे. सर दिनशाजी पुष्कळ दिवस सुखरूप असोत; त्यां- च्या हातून आणखी पुष्कळ पुण्यकर्मे घडोत; आणि त्यांच्या अनुकरणानें असे थोर पुरुष आमच्या राष्ट्रांत पुष्कळ पैदा होवोत, अशी परमेश्वराची प्रार्थना करून आह्मी हा लेख समाप्त करितों. राजेरजवाड्यांस विनंति. आर्या. गाईकवाड शिंदे होळकर निजाम हो तुह्मां नमन आधी करुनि विनवितों की ऐका करुनि विनति शांत मन. १. झाले तुमचे पूर्वज रणवीर पराक्रमी महाप्रबल त्यांच्या कथा परिसतां शत्रूच्या हातचा गळे कवळ. वडगांव नांव घेतां मोठेमोठेही टकमकां बघती हें आहे ज्ञात तुझां मग कां होतां उगाच खिन्नमती. २. ३.