पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/५७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५४ गेली होती तेव्हां, तेथलें वैभव पाहून त्या महाराजांची मति चकित होऊन गेली, आणि ते अर्से बोलले कीं, मुंबईतल्या व्यापारी लोकांपाशीं पैसा तरी किती ! ” ही गोष्ट ऐकींव आहे. तरी खरी आहे. असो. हैं दिनशाजींचें धर्मार्थ औदार्य लक्षांत आणून राणी- सरकारानें गेल्या मार्च महिन्यांत त्यांस व्यारोनेट ही पदवी दिली आहे. ही वंशपरंपरा चालेल. आतां सगळ्या हिंदु- स्थानांत एकंदर व्यारोनेट दोन; ते दोन्ही पार्शी गृहस्थ आहेत. हें पार्शी लोकांस अत्यंत भूषणावह होय. - - आमच्या हिंदुस्थानामध्ये असे व्यापारी आहेत, हें आह्मां सर्वोस भूषण आहे. आणखी, ह्या चरित्रावरून एक मोठी गोष्ट शिकण्यासारखी आहे; ती ही कीं, श्रीमंत होण्यास - राजापेक्षांही धनवान होण्यास - साधन काय तें एक आहे; तें कोणतें, तर व्यापार. ही गोष्ट केवळ माण- सांसच लागू नाहीं; राष्ट्रांसही लागू आहे. योगानें जसे सर दिनशाजी राजेरजवाड्यांपेक्षां अधिक संपत्तिमान झाले आहेत, पुष्कळ धर्म करण्यास समर्थ झाले आहेत, मोठे कीर्तिमान झाले आहेत, आणि मोठे राजमान्य झाले आहेत, तसें इतरांसही होतां येईल. उद्योग केला पाहिजे; आणि परमेश्वराचा आशीर्वाद पाहिजे. व्यापाराच्या तथापि, अशी पुष्कळ संपत्ति जवळ असणे ह्यांतच के- वळ भूषण नाहीं. व्यापारी लोक आणि विशेषेकरून गिरण्यांचे मालक जो पैसा मिळवितात, त्यांतला बहुतेक भाग गरीब श्रम करणाऱ्या मनुष्यांच्या निढळाच्या घामापासून उ त्पन्न झालेला असतो. ही गोष्ट त्यांनी लक्षांत ठेवून, आ- पला पैसा स्वतःस सुख देण्याकरितां नव्हे, तर समाजां-