Jump to content

पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/५०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४७ लोक काय बोलतात. घेतलें !! सर टो. माधवराव यांनीं राष्ट्रीयसभापक्षांतून आपलें आंग काढून पुढच्या वर्षाच्या फेब्रुवारी महिन्यांत सगळ्या हिंदुस्थानाची खानेसुमारी होणार आहे. बाबू सुरेंद्रनाथ बानरजी हे विलायतेस जाऊन पोंचले. त्यांची भाषणें चालू झाली आहेत. धारवाडाकडे एका ख्रिस्ती लिंगाइतास पावन करून पुन: जातींत घेतलें असें ह्मणतात. बरें आहे. विमानांत बसून वर जाऊन नंतर छत्री घेऊन खाली उडी मारण्याची कला एक बंगाली गृहस्थ शिकले आहेत. मि. ब्राडला ह्यांच्या बिलाच्या विरुद्ध एक दाहा हजार सह्यांचा अर्ज उत्तरहिंदुस्थानांतल्या मुसलमानांनी पाठविला आहे, असें ह्मणतात, लार्ड क्रास यांच्या बिलाच्या विरुद्ध आणि ब्राडला यांच्या बिलाच्या वतीचे असे सुमारें एक लाख सह्यांचे अर्ज मद्रासेहून विलायतेस गेले. मुंबई अद्याप झोंप घेत आहे. म्याजिक लांटर्नसारख्या एका दिव्याच्या साह्यानें सुंदर जाहिरातींच्या प्रतिमा अंधाऱ्या रात्री आकाशांतील ढगांवर पाडण्याची युक्ति एका अ मेरिकन मनुष्यानें काढिली आहे. गेल्या महिन्याच्या ९ व्या तारखेस, लार्ड रे यांचें स्मारक करण्याक- रितां एक मोठी सभा येथील टौनहालांत भरली होती. एकंदर सुमारें चाळीस हजार रुपये जमा झाले आहेत. भडोचजवळ एका गुजराथी ब्राह्मणीचें प्रेत जळत असतांना ज्या सरकारी अमलदारानें तें उचलून नेवविलें होतें, त्यास सरकारानें खानदेश जिल्ह्यांत बदलून त्याची बढती दोन वर्षे बंद केली आहे. ठीक केलें. आस्ट्रेलिआमध्यें जंगली सशांचा इतका त्रास झाला आहे कीं, त्यांचा