Jump to content

पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४६ निस्पृह असे. तो एके वेळीं लहान मुलांत खेळत असतां त्यास कोणीं असे विचारिलें कीं, "न्यायाधीशाचें काम तुझी नको- ह्मणून सांगून, मुलांत खेळतां हें काय ?" त्यावर त्यानें उत्तर दिलें, " राज्यकारभारांत लडबडण्यापेक्षां मुलांत खेळणें हें अ- धिक सुखावह नाहीं काय ?" पुढें कांहीं वेळानें, त्यास इरा- णचा राजा दारीयस ह्यानें कांहीं दिवस आपल्या दरबारांत राहण्यास मोठ्या आदरानें बोलाविलें. त्यास त्यानें जें उत्तर लिहून पाठविलें, त्यांत असें आहे:- - “लोकांस सत्य नको, न्याय नको. कशाही वेड्या वांकड्या उपायांनी आपणांला सुख मिळाले झणजे झाले, असे त्यांस वाटतें. मला त्याची मुळींच इच्छा नाहीं. मी कधीं कोणाचें वाईट चिंतीत नाहीं. मी कोणाशी वैर करीत नाहीं. राजमं दिरांतल्या सुखाचा आणि डामडौलाचा तिटकारा मला अतिश- यित आहे. मी तुमच्या इराण देशांत कधीं पाऊल देखील ठेव- णार नाहीं. मी अल्पतृत आहे; आणि मी स्वेच्छ राहाणार. " एका चतुर पुरुषानें एके ठिकाणीं असें झटले आहे कीं, ने- हमीं मनुष्याची आशा मोठी असते, आणि तिच्या मानानें सुख- प्राप्ति कमी होते; ह्मणून, सुखप्राप्ति हा अपूर्णांक नेहमीं सम आशा राहणारा आहे; ह्मणजे, ह्यांतला छेद ह्यांतल्या अंशापेक्षां निरंतर मोठा असावयाचा आहे. हा पर्याय सामान्य जनास मात्र लागू आहे; निस्पृहांस लागू नाहीं. कां कीं, तुकाराममहाराजांनी आ- पल्या अभंगांत ह्मटलेंच आहे कीं, आशेचें शून्य केलें; हाणजे, तुकाराममहाराजांच्या किंवा त्यांसारख्यांच्या संबंधानें हा अपूर्णांक सुखप्राप्ति असा झाला. ह्याचा अर्थ एवढाच कीं, आशा न ठे- ० वितां जें सुख प्राप्त होतें, तेंच पूर्ण सुख, तें सुख निस्पृहतेंत सांपडतें.