Jump to content

पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/५१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४८ समूळ नाश करण्याची युक्ति जो कोणी काढील, त्यास दाहा हजार पौंड बक्षीस देण्यास तेथले लोक तयार आहेत. सर लिपेल ग्रिफिन ह्मणतात की, "राजकारणांत हात घालणाऱ्या बं गाली लोकांस चाबुकाखालीं झोडपावें.” ठीकच आहे. सर लिपेल यांचीं पुण्यकर्मों बाहेर काढण्यास बंगाली लोकच कारण झाले आहेत. आपल्या मुलांस शिकविण्यास युरोपियन शिक्षक ठेवूं नये असें वचन माजी शिंदेसरकारांनीं लार्ड डफरीन यांजकडून घेतलें असतांही आतां एक युरोपियन शिक्षक नेमिला आहे. ह्या वचनभंगाबद्दल पार्लमेंटांत सवाल जबाब होत आहेत. जर्मन सैन्यांतल्या अमलदारांमध्यें ऐषआरामानें राहाण्याची संवय वाढत चालल्यामुळे, तशा ऐषआरामाची बंदी करण्याचा सक्त हुकूम बादशाहांनीं केला आहे. त्याचप्रमाणें, आजपर्यंत मानकऱ्यांस मात्र सैन्यांतल्या उच्च- प्रतीच्या जागा मिळत असत, त्या आंगचे गुण पाहून कोणत्याही मनुष्यास द्याव्या असें त्यांनी ठरविलें आहे. चालू सालीं ग्रेटब्रिटन व ऐर्लेडच्या राज्याचा खर्चवेंच जाऊन साडेतीस लक्ष पौंड शिलक राहतील असा अंदाज काढिला आहे. इंग्लंडांत जाणाऱ्या सोन्याच्या व रुप्याच्या भांड्यांवर जी मनस्वी जकात होती, ती काढून टा- किली आहे, आणि चाहावरचा कर बराच कमी केला आहे. ह्या दोन्ही कृ- त्यांनीं हिंदुस्थानाचा फायदा होणार आहे. कारण, इकडचें सोन्यारुप्यावरचें खोदींव काम व इकडचा चाहा तिकडे जास्त खपेल. गेल्या महिन्याच्या चवदाव्या व पंधराव्या तारखेस येथील युनिव्हर्सि- टीच्या सेनेटसर्भेत वादविवाद होऊन, बी. ए. पर्यंतचा अभ्यासक्रम चार वर्षाचा करावा असें ठरलें. त्या अभ्यासक्रमांत देशी भाषा घ्याव्या अशी सूचना करून रा. रा. वामन आबाजी मोडक यांनी चांगले भाषण केलें. परंतु त्यांची सूचना नापसंत झाली. एकीकडे ओरडायाचें कीं आमचे ग्राज्वेट लोकांत मिसळत नाहींत, आणि एकीकडे अशा रीतीचे ठराव करायाचे कीं, ग्राज्वेटांस लोकांत मिसळण्याचें कारणच पडूं नये !! सेने- टच्या हातून ही गोष्ट फार वाईट झाली आहे.