पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४५ रीख ठरविली होती. ह्मणून, त्या वेळापासून, तो प्रसंग टळल्याबद्दल, दरसाल मे महिन्याच्या पांचव्या तारखेस सर्व इंग्लंडभर व विशेषेकरून शाळेतल्या मुलांत उत्सव होत अ सतो. त्या वेळीं गायफाक्सचें एक भलें मोठें कागदाचें चित्र करून तें जाळितात; आणि मोठ्या आवेशाचीं भाषणें होतात. वर सांगितलेली गोष्ट विचार करण्यासारखी आहे. हिजवरून एवढेंच शिकावयाचें आहे कीं, धर्माच्या कामांत दुराग्रह हा फार नाशकारक आहे, तो धरूं नये; आणि दुःख निवारण्याकरितां जर असत्कर्म करण्याचें मनांत आ णिलें, तर, तें दुःख दुप्पट होतें; कमी होत नाहीं. आशेचें शून्य केलें. श्रीरामदासस्वामींनी आपल्या दासबोधामध्यें " कोणा कांहीं न मागावें," असा जो उपदेश केला आहे, त्याचें अवधारण करणें तीच निस्पृहता होय. आणि ज्यांनीं निस्पृहता धरिली, त्यांनींच आशेचें शून्य केलें ह्मणावयाचें. शिवाजीमहाराजांनी तुकाराममहाराजांस मोठ्या इतमामाचें बोलावणें पाठविलें, तेव्हां त्यांस त्यांनीं अभंगबद्ध एक उत्तर पां- ठविलें. त्यांत असें आहेः— - अभंग. मान दंभ चेष्टा हे तो शूकराची विष्टा. जन धन तन वाटे लेखावें वमन. १. २. तुझी घेणें काय हो मागणे आशेचें हें शून्य केलें तेणें. ३. त्याप्रमाणेंच हेराक्लिटस ह्या नांवाचा एक तत्त्ववेत्ता ग्रीस देशामध्यें एफिसस येथे प्राचीनकाळी होऊन गेला. तोही अत्यंत