पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३१


असें असुनियां आह्मां सोडुनि जाणें कां आवडलें इहलोकींचें प्रेम तुटुनि मन परलोकीं कां जडलें. २. ठीकच आहे, पापाचा या धरणीवर बाजार तो पाहुनियां वीट तयाचा आला तुम्हास फार. ३. यास्तव सोडुनि आह्मां सकळां गेलां पवित्र लोकीं त्यांत अन्यथा नाहीं केलें हें आह्मी ह्मणतों कीं. ४. आतां तुम्हास पाप कसें तें कधींहि न शिवायाचें मग दुःखाचें नांव कशानें ऐकाया यायाचें. ५. हेवा मत्सर लोभ मीपणा हे ठाऊकहि नसती अशा ठिकाणीं अखंड झाली आतां तुमची वसती. ६. ब्रह्मानंदरसी मन तुमचें मन सदा व्हायाचें हरिभक्तीविण काम दूसरें तुह्मांस न सुचायाचें. ७. थोर तूमचें पुण्य ह्मणुनि हे प्राप्त स्थिति तुम्हाला रहा निरंतर तिथें सुखानें करीत आनंदाला. ८. तथापि त्यांतचि एक विनंती आह्मी तुस करितों आणि सफल ती होइल ऐशी आशा चित्तीं धरितों. ९. आह्मां येथें निजकर्तव्यें व्हावी बुद्धि कराया शक्ति तशीच मिळावी आह्मां सद्यश त्यांत मिळाया. १०. निजराष्ट्रहित स्वहितापेक्षां लक्ष अधिक लागावें तें साधाया कायावाचामनेंकरुनि भागावें. ११. असें करावें देवाजीनें आह्मां इतुकें मागा आह्मांकरितां त्याच्या चरणीं जीवेंभावें लागा. १२.

वेळाचें मोल.

 आमच्या एका संस्कृत कवीनें ह्मटलें आहे, "कोट्यवधि रुष्टये उमर्चिले, तरी, आयुष्य गेलें आहे त्यांतला