पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३२


एक क्षणही परत प्राप्त व्हावयाचा नाहीं. " खरें आहे. असें जर पैशानें आयुष्य मिळतें, तर, कोट्याधीश माणसें निदान कांहीं वेळ तरी अधिक जगलीं असतीं. पण तें तसें नाहीं.

 आरोग्य आहे, संपत्ति आहे, सुशील कुटुंब आहे, आणि चांगली विद्या आहे, पण वेळ नाहीं - आयुष्य नाहीं – तर त्यांचा काय उपयोग ? त्यांचा उपभोग घ्यावा कसा ? आणि ह्मणूनच, ह्या सर्व वस्तूंपेक्षां वेळ ह्मणजे आयुष्य हें फार मोलाचें आहे, असें थोर पुरुष ह्मणतात.

 जरमी टेलर ह्मणून एक चांगला ग्रंथकार होऊन गेला. त्यानें असें ह्मटलें आहे कीं, "आळशीपणा ही वेळाची विलक्षण उधळपट्टी आहे. अत्यंत मोलवान आणि कांहीं केल्या परत हातीं लागावयाचा नाहीं असा जो वेळ, तो ह्या आळशीपणाच्या योगानें व्यर्थ जातो. " ह्याचा अनुभव प्रत्येकास येण्यासारखा आहे.

 लार्ड चेस्टरफील्ड ह्मणून एक मोठा श्रीमंत आणि शाहाणा गृहस्थ इंग्लंडांत होता. त्यानें आपल्या मुलास वेळाच्या संबंधानें एकदां असे लिहिलें कीं, “तुझा जो जो क्षण व्यर्थ जातो, तो तो क्षण तुझी योग्यता आणि तुझें सुख कमी करतो. पण, अन्यपक्षीं, जो जो क्षण तूं सत्कत खरचितोस, तो तो क्षण तुझ्या हातचा जात नाहीं, तर तो तुझ्या संग्रहीं पडत आहे – किंबहुना ती रकम विलक्षण भारी दरानें व्याजीं लागत आहे — असें तूं समज." हें ह्मणणें निरंतर लक्षांत ठेवण्यासारखे आहे. ह्मणजे, आपली विद्या आपण दुसन्यास शिकविली, तर ती आपणा-