पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२९


आतां, लार्ड रे ह्यांच्या जागेवर आलेले लार्ड हारिस

ह्यांच्याविषयीं दोन शब्द सांगायास पाहिजेत. हे इ० स० १८५१ ह्या वर्षी त्रिनिदाद येथें जन्मले.ह्यांचा विद्याभ्यास एटन ह्या नामांकित विद्यालयांत झाला.ते इ० स० १८७४ ह्या वर्षी बी. ए. झाले; आणि इ० स० १८८५ ह्या वर्षी हिंदुस्थानचे अंडर सेक्रेटरी झाले होते. हे मोठे चेंडूफळी खेळणारे आहेत, अशी ह्यांची आख्या आहे. हे इंडिया आफिसांत पुष्कळ दिवस होते,