पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२७

रच्या, ह्मणजे ज्यांच्या नेमणुका लोकमतानें झाल्या असत्या, अशा थोर लोकांच्या होऊं लागल्या. आणि तिसरी ही कीं, ह्या इलाख्यामध्यें आज कितीएक वर्षेपर्यंत सरकारी नौकऱ्यांचा विक्रय होतो ह्मणून जो अत्यंत लाजिरवाणा बोभाट चालला होता, त्याचें समूळ उत्पाटण झालें. ह्या तिसऱ्या प्रकरणांत लार्ड रे साहेबांचें विलक्षण धैर्य दिसून आलें. किंबहुना, इलबर्ट बिलाच्या वेळेस लार्ड रिपन ह्यांचें नीतिशौर्य जसें प्रगट झालें, तसें ह्या प्रकरणामध्यें लार्ड रे ह्यांचें नीतिशौर्य प्रगट झालें. गेल्या महिन्याच्या बाराव्या तारखेस ह्या शहराचा शेवटचा निरोप घेतांना ते ह्मणाले, " महाराणीचा जाहीरनामा ही हिंदुस्थानांतल्या /मजुरापासून तो राजापर्यंत सर्वांची सनद आहे. तिच्या तत्त्वांप्रमाणें मीं वागण्याचा प्रयत्न केला, आणि त्या तत्वांच्या विरुद्ध वागण्याविषयीं मला वरिष्ठ अधिकाऱ्यांचा हुकूम आल्याबरोबर मी आपला राजीनामा सादर केला. " ह्या प्रकरणांत लार्ड रे ह्यांस “धन्य धन्य" असें ह्मटल्यावांचून आमच्यानें राहावत नाहीं. ह्या प्रकरणावरून लार्ड रे ह्यांचें नांव हिंदुस्थानाच्या इतिहासांत अजरामर होईल. हे साहेब एकदां असें ह्मणाले की, “ ह्या आमच्या राज्यासारख्या मोठ्या राज्याच्या स्वास्थ्यास अत्यंत आवश्यक ह्मणून जे गुण आहेत, त्यांमध्यें, हा गुण विशेष आवश्यक आहे कीं, ह्यांत जिकडे तिकडे शांति आणि तृप्ति असावी. ” होय. हें शब्दशः खरें आहे. त्याप्रमाणेंच त्यांनीं एकदां असें ह्मटलें कीं, " विद्यार्थ्यांची मनें शोधक व्हावीं, हेंच त्यांच्या ज्ञानसंपादनाचें अत्युत्तम सार्थक होय. ” तेंही खरें आहे. शोधक मनांस असत्य