पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/२९०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२८७ लोक काय बोलतात. रशियाच्या शाहाजाद्यांची स्वारी चिनाकडे गेली. गेल्या महिन्याच्या सव्विसाव्या तारखेस हिंदुस्थानाची खानेसुमारी झाली. जपानामध्ये गेल्या दिसेंबर महिन्यांत नवीन पार्लमेंटसभा स्थापित झाली. लंडनशहरांत पांच लाख लोक कारकुनीच्या धंद्यावर पोट भरीत आहेत. इंग्लंड आणि फ्रान्स ह्यांच्यामध्यें इंग्लिश खाडी आहे. तिजवर पूल बांधण्याचा विचार चालला आहे. २. जर्मनीचे सेनाधिपति कौंट मोल्टके हे नव्वद वर्षाचे झाले आहेत तरी, त्यांची नेहमींची कामें सुरळीत चालली आहेत. इंग्लिश राज्याचा अंत जवळ आला आहे, असे कोणीएक बैरागी मद्रा- सेकडे सांगत फिरतो आहे असें ह्मणतात. कोकोनाडा येथील सबजज्जास अठरा महिन्यांची कैदेची शिक्षा झाली. पंचवीस हजार रुपये लांच खाल्ला त्याचें फळ ! सध्याच्या जर्मन बादशाहांची आई नुकतीच फ्रान्स देशांत गेली होती; तेथें तिचा अपमान झाल्यावरून जर्मन लोक चवताळले आहेत. श्री. सयाजीराव गायकवाड ह्यांनी आपल्या रयतेकडे राहिलेली इ. स. १८८७-८८ सालची साऱ्याची बाकी सोडिली. चांगलें केलें. हिंदुस्थानाविषयीं पार्लमेंटांत यथेच्छ वादविवाद व्हावा, त्यास वेळ चांगला मिळावा, असा ठराव झाला आहे. तो अमलांत येईल तेव्हां खरा. | म्याट्रिक्युलेशनची परीक्षा बंद व्हावी, आणि निरनिराळ्या कालेजांनी परीक्षा घेऊन आपले विद्यार्थी निवडावे अशी सूचना येथील युनिव्हर्सिटीस झाली आहे.