पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/२९१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२८८ मनुष्याच्या नाडीचे दरमिनिटास सरासरी ६९ ठोके पडतात असें ह्म- टलें, तर मनुष्य ८४ वर्षाचा होई तोपर्यंत त्याच्या नाडीचे२८६६७७६००० ठोके पडतील. आकाशांत डिनेमैट वगैरे पदार्थाचे बार केल्यानें पाऊस पडतो, या सम- जुतीच्या संबंधानें प्रयोग करून शोध करण्याकरितां युनैटेडस्टेट्स सरका- रानें पांच हजार रुपये खर्चण्याचा ठराव केला आहे. अमेरिकेमध्यें एका मनुष्यानें एक नवीन तोफ तयार केली आहे ह्मण- तात; तिच्यांतून डिनेमैटचे एक हजार गोळे एकसारखे सोडितां येऊन ते पांच मैल लांब जातात ! महाराणी सरकारचे मुख्य प्रधान लार्ड सालिसबरी ह्यांस यंत्रविद्येचा मोठा नाद आहे. त्यांचे दोन मुलगे आगगाडीचें यंत्र चालविण्यास शिकत आहेत. आमचेकडच्या बड्या लोकांच्या मुलांनी हे पाहावें. राष्ट्रीय सभेच्या वाऱ्यास देखील सरकारी कामदारांनी उभे राहातां का- मास नये, असा सरकारचा हुकूम आहे, असा जो समज लोकांत पसरला होता, तो खोटा आहे. तिच्या कामांत त्यांनीं पडूं नये, एवढेंच कायतें. पेनशनदारांनीं खुशाल पडावें. , उत्तरध्रुवास जाऊन पोचण्याच्या कामांत आजपर्यंत शेंकडों लोंकांनीं लाखों रुपये खर्चून प्रयत्न केले आहेत, परंतु त्यांस अद्याप फल आलें नाहीं. आतां दोघे फ्रेंच गृहस्थ विमानांत बसून त्या ध्रुवाचा शोध लावण्याचा प्रयत्न करणार आहेत. गेल्या महिन्याच्या सव्विसाव्या तारखेच्या मुंबई शहराच्या खानेसुमारी - मध्यें मुंबईची एकंदर लोकसंख्या ८०६४६४ भरली. पैकी ५०६१२४ पुरुष व २९८३३६ स्त्रिया होत्या. पुण्याची लोकसंख्या ११८६४७ भरली. सन १८७२ व १८८१ या सालीं ती अनुक्रमें ९९६२२ व ९०१३६ होती. ब्लिक हाल दा. क्र. 1999 391-468/