पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/२८९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२८६ खरमरीत उत्तर. इराणाचा बादशाहा दारियस आणि मासिडोनियाच बादशाहा फिलिप ह्यांचें वैमनस्य होतें. त्यांच्या चकमक झडून शेवटीं, फिलिप हा बादशाहा दारियसास शरण आला, आणि त्यानें त्याला, खंडणी ह्मणून दरसाल एवं हजार सोन्याचीं अंडी देण्याचें कबूल केलें. इतक्यां फिलिप बादशाहा मरण पावला, आणि त्याच्या गादीव त्याचा पराक्रमी पुत्र शिकंदर बादशाहा हा बसला. त्या जकडे दारियसाचा वकील खंडणी मागावयास गेल त्याला दरबारांत त्यानें साफ सांगितलें कीं, “जे पक्षी से न्याची अंडी घालीत होते, ते मरून परलोकवासी झाले आहेत. आतां अंडीं मिळावयाचीं नाहींत." त्यानंतर, 6 वळ उपहास करण्याकरितां, दारियसानें, विटी व दांडू, हीं शिकंदरास पोर समजून खेळायाला ह्मणून पाठविलीं, आणि आपली सेना असंख्य आहे, असें दर्शविण्याव- रितां पिशवीभर राळे पाठविले. त्यांपैकी दांडू हातांत घेऊन शिकंदर त्या वकीलास ह्मणाला, "हा माझा सो आहे; हा मी तुमच्या राजाच्या राज्याच्या टाळक्यांत ह णीन; आणखी, हे राळे आमचेकडचा एक पक्षी एव क्षणांत गट्ट करून टाकील; आणि आपल्या महाराजां आह्मी लिंबूं देतों हें देऊन सांगा कीं, हें खाऊन पाह ह्मणजे तुमचा परिणाम किती कडू होईल ह्याची कल्पः तुह्मांला करितां येईल." आणि अखेरीस परिणाम साच झाला. -