पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/२८८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२८५ ओळखीचें एकही माणूस त्याच्या दृष्टीस पडेना, आणि त्याला कोणी ओळखीना. तेव्हां त्यास असे वाटलें कीं, आपण कारागृहांतून सुटलों नसतों तर बरें झालें असतें. आणखी तो आपल्या जवळच्या माणसांस, रडून रडून ह्मणे कीं, मला पुनः माझ्या तुरुंगांत घालाल तर बरें होईल! श्रीकृष्णाचा युक्तिवाद. अर्जुनानें सुभद्रा नेली, ती पळवून नेली, त्यांत कांहीं अकर्म केलें नाहीं, असे प्रतिपादन श्रीकृष्णानें बळरामाशीं केलें, त्याचें वर्णन पंतांनीं केलें आहे :- आर्या. - . कृष्ण ह्मणे दादाजी पडला आहे असा विचार मला कीं भगिनीहरणास्तव जिष्णु तुह्मां दुष्ट वध्यसा गमला. कन्येच्या लाभाचा निश्चय नाहीं स्वयंवरीं स्पष्ट घ्यावें दान, दिलें तरि हें कर्महि मानधनजना कष्टं. धन देउनि घ्यावी तरि न अपत्याचा भला करी विकरा चित्तीं या दोषाच्या आणुनि त्या पंडितोत्तमें निकैरा. युक्त प्रसहरण क्षत्रप्रभवासि यांचि भावानें यदुकुरुकुलकीर्तिकरें नवरी हरिली महाप्रभावानें. मज तों असेंचि दिसतें कीं जो धर्मज्ञ शुद्ध कुल ज्याचें तो अन्याय करीना धर्मीच मन प्रसन्न कुलजांचें. ३. ४. १ मान हेंच धन वाटतें त्या जनांस. २ कष्टदायक. ३ तिटका- प्याला. ४ बलात्कारानें हरण करणें. ५ क्षत्रियकुली जन्मलेल्या पुरुषांस. ६ मोठा आहे पराक्रम त्यानें.