पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/२८७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१००८९ वि।) २८४ पाहून त्या सुभेदारानें त्याला वाबऱ्या घाबऱ्या विचारिलें कीं, 'अरे तुला वाचावयाची इच्छा नाहीं का झाली ?? त्यास त्या मुलानें नाहीं ह्मणून उत्तर दिलें. पण पुढे दोन दिवसांनीं तो मुलगा आंथरुणाच्या आंथरुणांत मेलेला सांपडला. " ● एम्. मर्सियर ह्यानें ह्या किल्ल्यांतल्या एका कैदीची गोष्ट लिहिली आहे. ती अशी की, फ्रान्स देशाचा राजा चौदावा लुई ह्यास कांहीं अपमानाचा शब्द बोलल्यावरून त्याला प्र- तिबंधांत टाकिलें होतें. त्याला सोळाव्या लुई राजाच्या प्रधानांनी प्रतिबंधमुक्त केलें. तो एकंदर सत्तेचाळीस वर्षे कैदेत होता. त्यानें तेथलीं दुःखें मोठ्या धैर्यानें सोशिलीं होतीं. त्याच्या आंगावर पांढरे पातळ केस होते, ते रांठ झाले होते, आणि त्याच्या आंगाची कातडी भोंवता- लच्या दगडांप्रमाणें टणक झाली होती. त्याच्या कोठडीचा दरवाजा मोकळा करून त्यास जेव्हां सांगितलें कीं, तुझी सुटका झाली आहे, तूं जा, तेव्हां त्याला त्याचा अर्थच कळेना. तो कांपत कांपत उभा राहिला आणि पुढच्या पडवींतून असा चालला कीं, त्याला ती पडवी पांच चार कोस लांब आहे की काय अशी वाटली. प्रथम उजेडाकडे पाहवेना. पण कांहीं वेळानें त्याला डोळे उघडून चालतां येऊं लागले. परंतु, गाडींत बसविलें तेव्हां त्याला घेरी आली. ह्मणून तो, आपल्या मित्राचा हात धरून धरून, आठवण करून, आपल्या घराच्या जा ग्यावर गेला. आणि पाहूं लागला तों तेथें घरबीर कांहीं नसून, तेथें एक सार्वजनिक इमारत बांधलेली त्याच्या दृ ष्टीस पडली. ती त्याला मुळींच ओळखतां येईना. त्याच्या त्याला प्रथम