Jump to content

पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/२८६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२८३ त्याच्या खोलींतल्या चटया जाळून टाकिल्या, आणि जें जें काय त्याच्याजवळ होतें त्याची राखरांगोळी करून टा किली. त्याच्या खोलीच्या भिंतींचा गिलावा खरवडून काढिला, आणि जमीन खणून टाकिली. ह्मणजे, त्याची कांहींएक खूण कोणाच्या दृष्टोत्पत्तीस येऊं नये असे केलें. हा कैदी सेंट मार्गराइट येथून बास्तिली येथें येत होता. तेव्हां मानशर डी सेंट मार्स हा त्याच्या बरोबर होता. तो, बोलतां बोलतां, त्या कैद्यास असें बोलला ह्मणून सांगतात की, "महाराज, तुमच्या जीवाला कांहीं भय नाहीं. तुझी गुपचुप पुढें चला ह्मणजे झालें." एका कैद्यानें एमला ग्रेंज चानसेल ह्यास असे सांगितलें कीं, “आमची कोठडी ह्या विलक्षण कैद्याच्या कोठडीच्या अगदी वर होती. आणखी धुरांड्याच्या वाटे आह्मांस त्याजपाशीं सहज बोलतां येत असे. तो आह्मांस असें सांगे कीं, मीं आपलें नांव जर तुझांस सांगितलें, तर, मी आपल्या जीवाला मुकेन, आणि तुझी आपल्या जीवाला मुकाल." इ० स० १७७८ ह्या वर्षी हा किल्ला बुद्ध्या आंत जा- ऊन अबी पेमन ह्या गृहस्थानें पाहिला. त्यानें त्याचें वर्णन केलें आहे. त्यांत असें आहे :– “तेथें मला ए- कटा एक अंमलदार भेटला. तो एकुणऐशीं वर्षांचा होता. त्याने मला एका न्हाव्याच्या मुलाची गोष्ट सां- गितली. तो ह्मणाला, माझ्या बापानें मला असे सांगितलें कीं, एके वेळी त्या मुलाला एक पांढरी बंडी सांपडली. तिजवर कांहीं लिहिलेलें होतें. ती बंडी त्यानें सहज ने- ऊन सुभेदार मानशर डी सेंट मार्स ह्यास दाखविली. ती -