पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/२८५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२८२ वाणी फार गोड होती. तो मोठा रसिक होता. तो पु- ष्कळ वाचीत असे, सतार चांगली वाजवीत असे, आणि नकशीच्या कामाची पारख त्याला फार चांगली होती. त्याला गुप्त राखण्याविषयीं ज्यापक्षी इतका बंदोबस्त ठेविला होता, त्यापक्षीं तो कोणी तरी मोठा मनुष्य असावा हैं उघड आहे. आणखी त्याच्या संबंधाच्या ज्या कांहीं गोष्टी लोकांत प्रसिद्ध आहेत, त्यांवरून असे वाटतें कीं, तो अखेरपर्यंत तसाच गुप्त राहिला. हा एक मोठा चमत्कार आहे. त्या गोष्टींमध्यें एक गोष्ट अशी आहे कीं, तो कैदी सेंट मार्गराइट येथें प्रतिबंधांत असतां, त्यानें आपल्या चा- कूनें आपल्या रुप्याच्या पेल्यावर कांहीं अक्षरें कोरिलीं- आणि तो पेला, खालीं समुद्रांत एक मासमार होडी होती, तिच्याजवळ टाकून दिला. तो पेला एका कोळ्यानें त्या कि, ल्ल्याच्या सुभेदाराजवळ आणून दिला. तो हातांत पडतांच त्या सुभेदारानें त्या कोळ्याला घाबऱ्या घाबया विचारिलें कीं, “तुला वाचतां येतें काय, आणि हा पेला तूं दुसऱ्या को- णास दाखविला होता काय ?" त्यानें उत्तर दिलें कीं, "मला वाचतां येत नाहीं, आणि मीं तो पेला दुसऱ्या कोणाला दाखविलाही नाहीं." तें कानीं पडलें तेव्हां त्या गव्हर- नराचा जीव खालीं पडला. आणि त्यानें त्या कोळ्यास निरोप देण्याच्या आधीं असें ह्मटलें कीं, “तुला वाचतां येत नाहीं, हें तुझें मोठें नशीब आहे. हेंच तुला वाचतां येत असतें, तर तूं आज खचीत प्राणास मुकलास असतास." हा दु- र्देवी कैदी, तसाच अज्ञातवासांत, इ० स० १७०३ च्या नोवेंबर महिन्यांत मरण पावला. हा कैदी मेल्यावर, त्याचे सगळे कपडे जाळून टाकिले,