पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/२८४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२८१ रच विलक्षण आहे. ती " लोखंडी मुखवटा ह्या नां- वानें प्रसिद्ध आहे. तो कैदी होता कोण, ह्याविषयीं ना- नाप्रकारच्या लोकांनीं नानाप्रकारचे तर्क केले आहेत, आणि अनेक ग्रंथकारांनीं अनेक कल्पना बसविल्या आ हेत, पण ते सगळे श्रम फुकट गेल्यासारखे झाले आहेत. तो कैदी, इ० स० १६९८ ह्या वर्षी, सेंट मार्गराइट ह्या बेटांतून, त्या किल्ल्याचा नवा सुभेदार मानशर डी सेंट मार्स ह्यानें आणिला. त्याच्याबरोबर बंदोबस्त फार मोठा होता. त्याच्या भोंवतीं, वाटेनें, स्वारांचा पा हारा होता. त्याला एका मेण्यांत बसविलें होतें, आणि स्वारांना अशी ताकीद होती कीं, त्यानें आपलें तोंड लो- कांस दाखविण्याचा किंवा आपण कोण आहों हें लोकांस समजविण्याचा यत्किचित् प्रयत्न केल्याचा नुसता संशय आल्याबरोबर त्याचें डोकें उडवावें. त्याच्या तोंडावर मखमालीचा भला जाड पडदा घातलेला होता. आणि त्याच्या आंत तारांच्या कमानींचा चाप तोंडास घातलेला होता. तो असा चमत्कारिक बनविला होता कीं, तो न काढतां त्याला सहज जेवतांखातां यावें. त्याला कि- ल्लयांत आणल्यावर त्याची बडदास्त चांगली ठेविली होती. त्याला खाण्यापिण्याला चांगलीं चांगलीं पक्कान्नें घालीत अ- सत. त्याप्रमाणेच त्याचा जामानामा बाडबिछाद हीं सगळीं एकाद्या राजासारखी असत. त्याची प्रकृति पाहण्यास एक वैद्य ठेविला होता. तो अर्से सांगे कीं, मी त्याची जीभ कितीएक वेळां पाहिली आहे, पण त्याचें तोंड माझ्या ह ष्टीस पडलें नाहीं. पण तो पुरुष फार सुंदर, सुकुमार, आणि भव्य असून त्याचा वर्ण तांबूस होता, आणि त्याची "" -