पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/२८३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२८० शोभण्यासारखी आहे. लेटर्स डी क्याचेट ह्या नांवाचीं समनें राजाच्या नांवानें तयार केलेलीं कोरीं तयार अ सत. त्यांत नांवें मात्र घालावयाची असत. तीं नांवें प्र- धानमंडळीने पाहिजेत त्यांची घालावीं, आणि त्या मा- णसांस धरून एकदम त्या किल्ल्यांत नेऊन टाकावें, असा क्रम असे. सरदार आणि मानकरी ह्यांच्या कुटुंबांत कोणी बे- बंद वागूं लागला कीं, ते त्यालाही ह्या तुरुंगांत एकदम पाठवीत असत. आणि हा अधिकार त्यांस सरकारांतून मिळाला होता. अशी स्थिति असल्यामुळें, प्रधानांच्या इतराजींतल्या माणसांस ह्या कारागृहांत काल क्रमावा लागत असे. आ णखी त्यामुळे दुष्ट प्रधानांस पाहिजेत तीं कुकर्मे यथेच्छ करण्यास सांपडत असत. तेव्हां प्रजाजनांस मनस्वी दुःखें भोगावीं लागत. लेटर्स डी क्याचेट हीं पत्रे आपल्या इच्छेप्रमाणें वाग- ण्यास, केवळ राजासच उपयोगी पडत असें नाहीं; त्याच्या भोंवतालच्या लुडबुड्या लोकांच्याही उपयोगी पडत अ- सत. आणि त्यांच्या वर्चस्वास मूळ आधार काय तो त्या पत्रांचा होता. त्या पत्रांच्या बळावर माणसें धरावीं, आणि त्यांस पांच पांच, दहा दहा, वीस वीस वर्षे, किंवा मरण येईपर्यंत देखील, कांहीं एक चौकशी न करितां, त्या किल्ल्यांत अडकवून ठेवावें, असें चालत असे. आपणांस कोणत्या अपराधावरून धरिलें आहे, हें देखील तेथील कितीएक कैद्यांस ठाऊक नसे !! तेथील कैद्यांच्या इतिहासांत एका कैद्याची गोष्ट फा-