पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/२८२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२७९ विचार केला तर हं स्पष्ट दिसून येईल कीं, सर्व वायुरूप पदार्थास जलरूप किंवा घनरूप देतां येतें, यावरून एक मोठा शास्त्रीय सिद्धांत निघतो. तो सिद्धांत हा कीं, हल्लीं जे पदार्थ वायुमय असे आपणांस दिसतात, त्यांचें मूळ स्वरूप, बाकीच्या पदार्थांप्रमाणें, घनच होय. उष्ण- तेच्या कमजास्त प्रभावाच्या मानानें हल्लींचे फेरफार झाले आहेत. तसेंच, ह्या शोधांच्या योगानें अर्वाचीन कलां- सही पुष्कळ साह्य झालें आहे. बास्तिली किल्लयाविषयीं आणखी माहिती. पृथ्वीच्या पाठीवर भयंकर क्रूरकर्मे घडलेली अशीं जीं ठिकाणें इतिहासांत प्रसिद्ध आहेत, त्यांत ह्या किल्ल्याची बरोबरी करणारें एक देखील ठिकाण कदाचित् नसेल. हा किल्ला फ्रान्स देशामध्ये होता. ह्याच्या विषयींच्या गोष्टी ह्मणजे यमयातनांच्या कथा होत. त्यांतल्या कांहीं गोष्टी ऐकून असें वाटतें कीं, त्या गोष्टींशी संबंध आपला नव्हता किंवा नाहीं, हा आपणावर परमेश्वराचा मोठा प्रसाद आहे. त्यांतल्या एक दोन गोष्टी मासल्याकरितां येथे सांगतों. ● फ्रान्सामध्यें राजकीय कैद्यांस ठेवावयाचें ठिकाण ह्म- टलें ह्मणजे बास्तिली हा किल्ला होता. तो इसवी सन १३८३ ह्या वर्षी बांधला होता. त्या किल्ल्यांत जितक्या यातना माणसांनीं भोगल्या आहेत, तितक्या यातना भो गलेलें ठिकाण ह्या पृथ्वीवर दुसरें कोठेंही सांपडावयाचें नाहीं. त्या किल्ल्यास यमलोकाची उपमा दिली तरी