पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/२८१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२७८ ह्मणून ह्या गोष्टीच्या संबंधानें एकोनएक वायु एकसारखे आहेत असें सिद्ध झाले आहे. शीतोपचाराचा उपाय, निरनिराळ्या पदार्थाच्या वा- फांस जलरूप किंवा घनरूप देण्याच्या कामीं योजितात. आणि याचा विशेष उपयोग, जलरूप पदार्थातला अशुद्ध पदार्थ काढून टाकण्याच्या कामीं करितात. उदाहरणार्थ, पाणी शुद्ध करावयाचें असलें, तर तें एकाद्या भांड्यांत कढवून, त्याची वाफ गार पाण्यानें थंड ठेविलेल्या नळींतून नेऊन थिजवितात; आणि शेवटीं त्या पाण्यांतला मळ त्या भांड्यांत राहातो. त्याचप्रमाणें, निरनिराळ्या उष्णतामा- नांस ज्यांस कड येतो असे दोन किंवा अधिक पातळ पदार्थ जर एकमेकांत मिसळलेले असले, तर त्या मिश्र प दार्थोतले ते घटकावयव ह्याच रीतीनें वेगळे काढितां ये- तात. असे करण्यास तो मिश्र पदार्थ घेऊन ऊन करावा, आणि निरनिराळ्या उष्णतामानाच्या वेळी त्यांतून येणारी वाफ वर सांगितल्याप्रमाणें शीतोपचारानें निरनिराळी थिजवावी. ह्या रीतीनें अलकोहोल (दारूचा अर्क) व पाणी हीं दोन्ही एकमेकांपासून वेगळीं काढितां येतात. मीठ, कळीचा चुना, वगैरे कांहीं पदार्थ उघडे राहिले असतां ओले होतात; हैं रसायनाकर्षणाचें एक उदाहरण होय. हवेंत असलेली वाफ ते आकर्षण करून घेऊन, तिला जलरूप प्राप्त करून देतात. या सगळ्या गोष्टींवरून एकाद्यास असे वाटण्याचा सं- भव आहे की, वायूंस जलरूप किंवा घनरूप देण्याचा प्र- यत्न करण्याचा अर्थ काय? हा उगाच खटाटोप कशाला ? प्रथमदर्शनीं हा खटाटोप व्यर्थ दिसतो खरा. परंतु थोडा