पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/२८०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२७७ तळ पदार्थ टाकिला ह्मणजे इतकी थंडी उत्पन्न होते की त्याच्या योगानें पारा देखील गोठवितां येतो. कांहीं वायुरूप पदार्थ जलरूप करण्याची रीत याहू- नही सोपी आहे. ह्या रीतीमध्यें मुख्य सामुग्री ह्मटली ह्म- णजे एक वेलांटीसारखी वांकडी केलेली मजबूत कांचेची नळी होय. ही नळी एका बाजूनें बंद असावी. ह्या न- ळीच्या एका पायामध्यें, ज्या वायूस आपणांस जलरूप द्यावयाचें असेल, तो वायु तयार करण्याचे पदार्थ घालावे; आणि मग उघडे राहिलेलें शेवट वितळवून बंद करून टाकावें. नंतर ज्या पायांत ते पदार्थ असतील, तो पाय ऊन करावा, आणि दुसरा पाय बर्फाच्या चुन्यांत घालून ठेवावा. ह्मणजे, आंतले पदार्थ ऊन झाल्यानें त्यांपासून जो वायु उत्पन्न होतो त्यास बाहेर जाण्यास वाट न सांपडून तो आंतल्याआंत कोंडला जातो. आणि ह्याप्रमाणें आंतल्याआंत उत्पन्न झालेल्या दाबाच्या योगानें आणि बाहेरच्या थंडीच्या योगानें तो वायु पातळ होऊन, गार केलेल्या शेवटांत ज- मून राहातो. ह्या पद्धतीच्या साह्यानें पुष्कळ वायु जलरूप करितां येतात. परंतु आंतल्या वायूच्या दाबाच्या योगानें नळी फुटण्याचा संभव असतो ह्मणून असा प्रयोग करणें तो फार जपून करावा. इसवी सन १८७७ ह्या वर्षापर्यंत विद्वान लोकांस असें वाटत होतें कीं, आक्सिजन, हैद्रोजन, नैत्रोजन, व आणखी एक दोन वायु ह्यांस कांहीं केलें तरी जलरूप देतां यावयाचें नाहीं, हे अचल वायु होत. परंतु त्या व- र्षाच्या अखेरीस त्या सर्व वायूंस जलरूप देतां आलें आणि २४