पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/२७९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२७६ पहिले दोन्ही उपाय एकदम योजितात ह्मणजे, त्या वा- यूवर दाब पडे असें करून त्यावर शीतोपचार करितात. वायूवर दाब पाडणें ह्मणजे वायु तितकाच ठेवून त्याची राहावयाची जागा कमी करणें, अगर जागा तितकीच ठे- वून, तींत आणखी वायु भरणें. एकीकडून बंद केलेल्या नळींत वारा भरून, उघढ्या तोंडांत दट्टया गच्च बसवून तो खालीं दावीत नेणें, हें पहिल्या प्रकारच्या कृतीचें उदा- हरण होय; परंतु, ह्या कृतीस जागा फार लागत अस ल्यामुळे, दुसऱ्या प्रकारच्या कृतीचें अवलंबन करितात. बहुतकरून, ज्या वायूला जलरूप किंवा घनरूप द्याव- याचें असतें, तो वायु पिशव्यांत भरून ठेविलेला असतो, आणि एका नळीच्या द्वारें, एका पंपाच्या साह्यानें, तो वायु एका खूब भक्कम भांड्यांत भरितात. त्या भां- ड्याच्या भोंवतालीं, तें अगदीं थंड राहण्याकरितां, बर्फ व मीठ घातलेलें असतें. ह्याप्रमाणें, दाब आणि शीतो- पचार ह्यांच्या योगानें कितीएक वायु जलरूप करितां ये- तात. त्यांपैकीं, कोळसा जाळल्यानें कार्बानिक आसिड नांवाचा जो वायु उत्पन्न होतो, त्याचा एक विशेष चम- त्कार आहे. तो असा. वर सांगितलेल्या भांड्यांत तो वायु खूब भरल्यानंतर त्या भांड्याचें झांकण जर उघ- डलें, तर त्यांतल्या पातळ झालेल्या कार्बानिक आसिडाचा थोडासा अंश वायुरूप होऊन उडून जातो, परंतु तो आ- पल्याबरोबर इतकी उष्णता घेऊन जातो कीं, बाकी राहि- लेलें कार्बानिक आसिड लागलेंच घन होतें-ह्मणजे त्याचे खडे होतात. ह्या खड्यांत इथर नांवाचा एक पा-