पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/२७८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२७५ वायुरूप. ह्यांपैकीं, पदार्थोस वायुरूप स्थितीप्रत पोंचवि- ण्याच्या संबंधाचे कांहीं नियम मार्गे एकदा सांगितले आहेत. आतां वायुरूप पदार्थोस जलरूप किंवा घनरूप कसें देतां येतें, ह्याविषयीं कांहीं सांगावयाचें आहे. घनपदार्थोतले परमाणु परस्परांशीं अगदी चिकटलेले असतात, प्रवाही पदार्थातले परमाणु एकमेकांवरून भ राभर सरकत असतात, आणि वायुरूप पदार्थीतले परमाणु एकमेकांपासून दूर दूर पळत असतात. ह्यावरून, वायु- रूप पदार्थास प्रवाहरूप किंवा घनरूप देणें ह्मणजे त्यांच्या परमाणूंच्या आंगची ही घांवण्याची शक्ति काढून, ते जवळ जवळ राहात असें करणें होय, हें उघड आहे. असे करण्याचा एक उपाय अगदी प्रथमदर्शनींच दि- सतो. शाळेंतून पळून जाणाच्या मुलांस ज्याप्रमाणें मा- रूनमुटकून शाळेंत आणून बसवितात, त्याप्रमाणें, ह्या सैरावैरा धावणाऱ्या परमाणूंस जबरदस्तीनें एकमेकांजवळ आणून बसविलें पाहिजे. आणि खरोखरच हा एक उ पाय आहे. पुष्कळ दाब दिला ह्मणजे कितीएक वायुरूप पदार्थ जलरूप होतात. शीतोपचार हा दुसरा एक उपाय आहे. वायुरूप पदार्थोतले परमाणु दूर दूर पळण्याचें मूळ कारण उष्णता होय. ती उष्णता शीतोपचार करून जर काढून टाकिली, तर अर्थात् ते दूर दूर पळणार नाहींत; एकत्र राहातील. तिसरा उपाय रसायनाकर्षण हा आहे. ह्याच्या यो- गानें कितीएक वायुरूप पदार्थ आकर्षित होऊन त्यांस जलरूप प्राप्त होतें. वायुरूप पदार्थ जलरूप करण्याच्या कृतींत बहुतकरून