पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/२७७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२७४ पाहिजे. आणि तो विचार साहचर्यानें आपोआप सुचतो. पाश्चिमात्यांतले विद्वान पाहून, तसे विद्वान आमच्यांत होऊं लागले आहेत, त्याप्रमाणें, इंग्लंडानें स्वसाह्यावर भरंवसा ठेवून, उद्योग करून, जसें आपलें कल्याण करून घेतलें, तसें, आपणही स्वसाह्यावर विश्वास ठेवून, उद्योग करून, आपलें कल्याण करून घ्यावें, असें हिंदुस्था- नाच्या मनांत आलें आहे; ही गोष्ट अभिनंदनीय होय. तरी, जार्ज वाशिंग्टनानें, अध्यक्षत्व सोडतेवेळी आपल्या बंधुजनांस जें काय फार मोठ्या कळकळीने सांगि- तलें आहे, तें आमच्या हिंदुस्थानानें निरंतर लक्षांत ठेविलें पाहिजे. तें हें कीं, "संभाळा; आपल्या राष्ट्रास संभाळा; ह्याचें चांगलें रक्षण करा. दुसऱ्या राष्ट्रांच्या साह्याच्या विश्वासावर जाऊं नका. कोणीं कसाही स्नेह दाखविला, तरी हें खचीत लक्षांत ठेवा कीं, तुमच्यापासून त्या साह्याची दुप्पट तिप्पट घेतल्यावांचून तें तुह्मांला कोणी देणार नाहीं.” ह्याचें तात्पर्य हेंच कीं, परक्यांवर अवलंबून राहू नका. आपल्या स्वताच्या उद्योगावर स- गळा भार घाला. आणि जें काय चांगलें व्हावयाचें असेल तें ह्यानें होईल, असें समजा. हेंच स्वसाह्य होय. हें जसं माणसांस पाहिजे आहे तसे राष्ट्रांसही पाहिजे आहे. आणि राष्ट्रांस पाहिजे ह्याचा अर्थ, राष्ट्राच्या संबंधानें त्यांतल्या माणसांस पाहिजे. एवढे सांगणें पुरे असे वाटतें. वायुरूप पदार्थास जलरूप किंवा घनरूप देणें. पदार्थाच्या अवस्था तीन आहेत; घन, प्रवाही आणि