पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/२७६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२७३ आणि कदाचित् राग येईल. त्याप्रमाणेंच, आपलें स्वतःचें किंवा आपल्या राष्ट्राचें किंवा जगाचें कांहीं बरें करण्याचें जें अल्पस्वल्प सामर्थ्य परमेश्वरानें आपणांस दिलें आहे, त्याचा उपयोग न करितां तें तसेंच राहू दिलें आणि वायां जाऊं दिलें तर, त्या दात्यास ह्मणजे परमेश्वरास वाईट वाटावें, अथवा कदाचित् राग यावा, हें साहजिक आहे. ह्मणून, आपले ठायीं “जगीं वंद्य" असें जें काय करण्याचें सामर्थ्य आहे, त्याचा व्यय आपण करीत असावें, हें आपले कर्तव्य आहे. - ह्या सामर्थ्यामध्यें स्वसाह्य हें मुख्य आहे - मूळबीज आहे. स्वसाह्य ह्मणजे आपण आपणांसच साह्य करणें- आपणांस जें काय बरें वाटतें तें करवेल तितकें करणें होय. तें आपण सर्वांनीं केलें पाहिजे. आणखी माणसांचें अगदी पहिलें आणि परमपवित्र असें कर्तव्य हेंच आहे. एका इंग्रज कवीनें ह्मटलें आहे:- “परोपकार करवेल तितका करा, जेथें जेथें करवेल तेथें तेथें करा, ज्या ज्या रीतीनें करवेल त्या त्या रीतीनें करा, ज्यावर ज्यावर करवेल त्या- वर त्यावर करा." ह्या सगळ्यास स्वसाह्य आधीं पाहिजे. आणखी, स्वसाह्यावलंबनाचा चमत्कार असा आहे कीं, ह्याचें पूर्ण स्वरूप दुसऱ्याचे ठायीं दृष्टीस पडलें, ह्मणजे, तसें आपण करण्याविषयीं मनुष्याचे ठायीं प्रेरणा उत्पन्न होते. ती मूळ कित्त्याच्याइतकी प्रबल नसते; पण तिच्या खालोखाल असते. आणखी, ती अनेकांच्या आंगची एकत्र होऊन, महत्कार्याच्या सिद्धीस उपयोगी पडते. हा प्रकार राज्यस्थापक आणि धर्मस्थापक ह्यांच्या चरित्रांत स्पष्टपणें दृश्यमान होतो. तो पाहून त्याचा विचार आपण केला