पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/२७५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२७२ सूर्य आहे; तेवढा जर काढून घेतला, तर बाकी सगळा अंधेर आहे. ह्याचा अर्थ एवढाच आहे की, त्या संस्था- नांस जें स्वातंत्र्य प्राप्त आहे, तें सगळें जार्ज वाशिंगूट- नाच्या पराक्रमाचें फल आहे; आणि त्याचा पराक्रम हा त्याच्या आंगच्या हिमतीचा ह्मणजे स्वसाह्याचा परिणाम आहे. नेपोलियन बोनापार्टाविषयीं अशी एक आख्यायिका आहे कीं, तो नेहमीं असें ह्मणत असे कीं, "अशक्य हा शब्द माझ्या कोशांत मुळींच नाहीं." ह्मणजे, त्याला अ- शक्य किंवा दुष्कर असें कांहींच वाटत नसे. ह्मणूनच त्याचे हातून एवढाले मोठे पराक्रम झाले. ह्यासच स्व- साह्यावलंबन ह्मणावयाचें खातरीनें खचीत सिद्धीस ने- ईन, अशी प्रतिज्ञा करण्यासारखा एकही व्यवहार दुनयेंत नाहीं. " दिसे क्षणिक सर्व हें भरंवसा घडीचा नसे ध- रील मन आधिनें बहु परि भ्रमे चाकसें" असें तर आहे. परंतु, प्रयत्न करणें हें माणसांचें काम आहे. औषध दिलें असतां रोगी खचीत बरा होईलच, असें कोणाही वैद्याच्यानें खातरीनें सांगवत नाहीं; तथापि देववतील तितकीं औषधें देणें हें अवश्य कर्तव्य आहे; आणि त्यांत कसूर करणें हें पाप आहे. त्याप्रमाणें, अमक्या प्रका- रचा उद्योग केला असतां अमकें कार्य होईल, असे जरी कोणाच्यानें खातरीनें सांगवत नाहीं, तरी, “जगीं वंद्य " तें करण्यास यथाशक्ति प्रयत्न केले पाहिजेत; आणि ते न करणें हें पातक आहे. एकाद्यानें कृपाकरून आपणांस कांहीं चांगला पदार्थ खायास दिला, तो आपण न खातां तसाच सडूं दिला, तर तें पाहून त्याला वाईट वाटेल,